नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित शिवदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, भालेर येथील दहावीतली विद्यार्थिनी सुष्मिता मधुकर पाटील हिने राज्यस्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेत नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करत उत्तम कामगिरी केली. तिने स्पर्धेत सातवा क्रमांक पटकावला.
नुकत्याच अहमदनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेत मुलींच्या १७ वर्ष वयोगटातील एकूण नऊ विभागातून १६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत उत्तम कामगिरी पार पाडत तीने सातवे स्थान पटकावले.
संस्थेचे चेअरमन चंद्रकांत रघुवंशी,व्हॉईस चेअरमन मनोज रघुवंशी, सरचिटणीस यशवंतराव पाटील, कार्यालयीन अधीक्षक पुष्पेन्द्रजी रघुवंशी,प्राचार्य आर.एच.बागुल, पर्यवेक्षक व्हीं.जे.पाटील यांनी सुष्मिता पाटील चे कौतुक केले. तिचे मार्गदर्शक एन.जी. पाटील, क्रीडा शिक्षक ए .एस.शिंदे यांनी मार्गदर्शन केले. सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर वृंद यांनीही कौतुक केले.