Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

हस्ती-जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची पारितोषिक रचना जाहीर,प्रथमच विनोदी एकांकिकासाठी सांघिक पारितोषिक

team by team
January 31, 2024
in राज्य
0
हस्ती-जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची पारितोषिक रचना जाहीर,प्रथमच विनोदी एकांकिकासाठी सांघिक पारितोषिक

नंदुरबार l प्रतिनिधी
येथे हस्ती-जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ही दि.१० ते ११ फेब्रुवारी २०२४ दरम्यान संपन्न होणार असून या स्पर्धेतील विजेत्यांना दिल्या जाणार्‍या पारितोषिकांची रचना आयोजन समितीतर्फे जाहीर करण्यात आली.

 

 

नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ शिंदे, ता.जि.नंदुरबारतर्फे आयोजित दि हस्ती को-ऑप बँक लिमिटेड प्रायोजित राज्य पुरस्कृत शिक्षक जयदेव लिंबा पेंढारकर तथा जिभाऊ यांच्या स्मरणार्थ हस्ती-जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा दि.१० व ११ फेब्रुवारी २०२४ दरम्यान होणार आहे.

 

 

 

या स्पर्धेचे यंदाचे १३ वे वर्ष आहे. स्पर्धेत प्रथमच विनोदी एकांकिकासाठी सांघिक पारितोषिक देण्यात येणार आहे, असे आयोजकांनी जाहीर केले. तसेच उर्वरित पारितोषिक रचना पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली. त्यात प्रथम येणार्‍या एकांकिकेस जिभाऊ करंडक सह ११ हजार रुपयाचा धनादेश व प्रशस्तीपत्र मिळतील. तसेच द्वितीय व तृतीय एकांकिकेस अनुक्रमे करंडकासह ७ हजार रुपये व ५ हजार रुपयांचा धनादेश व प्रशस्तीपत्रके मिळतील. उत्कृष्ट प्रायोगिक एकांकिका, लक्षवेधी एकांकिका व विनोदी एकांकिकेसाठी प्रत्येकी २ हजार रुपये, करंडक व प्रशस्तीपत्रके मिळतील.

 

 

 

सर्वोत्कृष्ट अभिनय पुरुष व स्त्री तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन प्रथम साठी रोखे २ हजार रुपये, द्वितीय साठी रोखे १ हजार रुपये व तृतीय साठी रोखे पाचशे रुपये सह स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात येतील. त्याचप्रमाणे सर्वोत्कृष्ट संगीत, लेखन, नेपथ्य, प्रकाश योजना यासाठी ही प्रत्येकी रोखे २ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रके देण्यात येतील. तसेच सहभागी संघांना देखील सहभागाची प्रशस्तीपत्रके देण्यात येतील असे आयोजकांतर्फे जाहीर करण्यात आले आहे.
या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत राज्यातील जास्तीत जास्त नाट्य संस्थांनी व महाविद्यालयांनी सहभागी होऊन नंदुरबार जिल्ह्यातील नाट्य चळवळीला चालना द्यावी असे आवाहन आयोजक नागसेन पेंढारकर, मनोज सोनार, राजेश जाधव, आशिष खैरनार यांच्यासह क्षमा वासे-वसईकर, कुणाल वसईकर, सागर कदम, काशिनाथ सूर्यवंशी, जितेंद्र खवळे, तुषार ठाकरे, राहुल खेडकर, पुरुषोत्तम विसपुते, हर्षल महिरे, तुषार सांगोरे, रत्नदीप पवार, प्रफुल्ल महिरे आदींनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

सुशिक्षित बेरोजगारांसाठी प्रशिक्षण : डॉ. उ. दे. पाटील

Next Post

सुष्मिताची राज्यस्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेत उत्तम कामगिरी

Next Post
सुष्मिताची राज्यस्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेत उत्तम कामगिरी

सुष्मिताची राज्यस्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेत उत्तम कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add