नंदुरबार l प्रतिनिधी
मकर संक्रांति निमित्ताने सहयोग सोशल ग्रुप तळोदा द्वारे मोफत पक्षी चिकित्सालयाचे उद्घाटन करण्यात आले.
नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांती निमित्त पतंग उडवण्याचा आनंद शहरात तसेच इतर भागातही घेतला जातो परंतु पतंग उडविण्याचा आनंदा सोबतच पतंग उडवण्यासाठी लागणारा धागा प्लास्टिक काच नायलॉन धागा धातूच्या चुरा विविध रसायने पासून बनविलेला धोकादायक मांजा वापरामुळे अनेकांच्या जीवावर बेतलेली आहे नायलॉन अथवा चायना मांजा याचा वापर अधिक केला जातो.
या धाग्यामुळे आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना इजा होऊन अनेकांना जीव गमवावा लागतो, सहयोग सोशल ग्रुप तळोदा यांच्याद्वारे एक अनोखा उपक्रम दरवर्षी राबविला जातो तो म्हणजे मोफत पक्षी चिकित्सालय. पक्षी वाचवा पर्यावरण टिकवा या अभियानाअंतर्गत शहरातील सेवाभावी सामाजिक संस्था सहयोग सोशल ग्रुप तर्फे दिनांक 13 ते 15 जानेवारीपर्यंत कॉलेज रोड वरील डॉक्टर योगेश बडगुजर यांच्या दवाखान्याजवळ तात्पुरते पक्षीचिकित्सालय च्या शुभारंभ आज करण्यात आला.
चिकित्सालयाचे उद्घाटन तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष ॲड.अल्पेश जैन, डॉक्टर योगेश बडगुजर, महेंद्र सूर्यवंशी, प्रा. रमेश मगरे, कीर्ती कुमार शहा, अशोक सूर्यवंशी, पंडित भामरे ,रमेश कुमार भाट ,राजाराम राणे, मयूर तुरखिया, हेतन भाई शाहा,वसंत वळवी ,चेतन शर्मा,नितीन पाटील आदी उपस्थित होते,
पक्षांना या काळात तातडीने योग्य औषध उपचार मिळवून त्याचे प्राण वाचविणे व पर्यावरणाच्या समतोल राखण्याच्या दृष्टीने तात्पुरते पक्षी चिकित्सालय शहराच्या मध्यवर्ती भागात कार्यान्वित करणे हा एक माणुसकीचा भाग असून हे कार्य सहयोग सोशल ग्रुप या सेवाभावी सामाजिक संघटने कडून दरवर्षी करण्यात येते यावर्षी हे चिकित्सालय सुरू करून हे कार्यपुढे नेत असल्याबद्दल पर्यावरण प्रेमी कडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
पतंग उत्सवात कोणी पक्षी जखमी झाल्यास त्यांना औषध उपचारासाठी कॉलेज रोडवरील डॉ. योगेश बडगुजर यांच्या दवाखान्याजवळ असलेल्या चिकित्सालयात आणण्याचे आव्हान याप्रसंगी करण्यात आले या कार्यक्रमासाठी तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर डी.एस. गावित, डॉ. राजेश पावरा ,डॉ. ओंकार पाडवी ,डॉ. बनकर पाडवी, डॉ लोकेश पाटील डॉ.योगेश बडगुजर यांचे सहकार्य लाभले .
सहयोग सोशल ग्रुप तर्फे तात्पुरते पक्षीचिकित्सालयाच्या शुभारंभाच्या हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून पतंगोत्सवात जखमी पक्षांसाठी हा वरदान ठरणार आहे पतंग उडविताना समाजातील लोकांनी पक्षी जखमी होणार नाही कोणाला इजा होणार नाही व घातक अशा नायलॉन मांजाच्या उपयोग करू नये या दृष्टीने खबरदारी घेतल्यास निश्चितच पक्षी जखमी होणार नाही तो कुणालाही अपाय होणार नाही
राहुल पवार, पोलीस निरीक्षक तळोदा
स्वतःच्या आनंदामुळे इतरांना इजा होऊ नये, पक्षी वाचवा पर्यावरण टिकवा, पक्षी जगवा यासाठी जनजागृती मोहीम राबवणे गरजे आहे विद्यार्थी लहान मुलं यांनी विशेष करून या काळात काळजी घेण्याबाबत सांगितलं.
ॲड.अल्पेश जैन अध्यक्ष सहयोग सोशल ग्रुप तळोदा








