नंदुरबार l प्रतिनिधी
येथील गृहरक्षक दलातील पलटन नायक पावबा छगन मराठे यांची गृहरक्षक दलाच्या कंपनी नायकपदी पदोन्नती करण्यात आली आहे. नुकताच होमगार्ड पथक कार्यालयाच्या पदोन्नती गुणगौरव कार्यक्रमात त्यांना कंपनी नायक पदाचे नियुक्तीपत्र देवून गौरविण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार जिल्हा अपर पोलीस अधिक्षक तथा जिल्हा समादेशक अधिक्षक होमगार्ड पथक निलेश तांबे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून होमगार्ड पथकाचे माजी समादेशक अधिकारी मनोज श्रॉफ, कौटील्य फाऊंडेशनचे संचालक प्रविण पाटील, श्रीमती सुलभा महिरे, नरेंद्र सराफ, सुरेंद्र छिंकारा, श्रीराम दाऊतखाने आदी उपस्थित होते.
पावबा मराठे यांची होमगार्ड पथकात तीस वर्ष सेवा झाली आहे. याआधी ते पलटन नायक म्हणून काम पहात होते. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांची आता कंपनी नायक म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे. त्यांच्या पदोन्नतीने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.








