Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांची नवापूर पोलीस ठाण्याला भेट

team by team
December 29, 2023
in राज्य
0
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांची नवापूर पोलीस ठाण्याला भेट

नंदुरबार l प्रतिनिधी

 

 

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी. शेखर पाटील हे 27 ते 30 डिसेंबर 2023 रोजी पर्यंत नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी नंदुरबार येथे आले आहेत. दरम्यान त्यांनी नवापूर पोलीस ठाणे येथे भेट दिली. त्यावेळी जिल्हा पोलीस दलाच्यावतीने पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी. शेखर पाटील यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

 

 

 

 

यावेळी डॉ.बी.जी. शेखर पाटील यांनी नवापूर पोलीस ठाण्याचे आवार, परिसर पाहून पोलीस ठाण्यातील स्वच्छतेबाबत समाधान व्यक्त केले. नवापूर पोलीस ठाण्याचे गुन्हे अभिलेख, गोपनीय अभिलेख, शस्त्रागार, वाचनालय, व्यायामशाळा यांची पाहणी केली. त्याचप्रमाणे नवापूर पोलीस ठाण्याने वर्षभरात केलेल्या कामगिरीची तसेच पोलीस व जनता संबंध वृध्दूी ंगत होण्यासाठी राबविलेले उपक्रम याबाबत सविस्तर माहिती घेतली. शस्त्रागाराची पाहणी केल्यानंतर पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी नियमीत गोळीबार सराव करण्याबाबत सांगितले.

 

 

 

त्यानंतर नवापूर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार करीत असलेल्या कामाचा आढावा घेवून त्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करुन प्रत्येक पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कायद्यात येणाऱ्या नवीन तरतूदींबाबत स्वतःला अद्यावत ठेवणेबाबत सूचना केल्या. त्यानंतर वाचनालयाची पाहणी करुनपोलीस अधिकारी व अमंलदारांनी” नियमित वाचन केल्यास पुस्तकांचा प्रभाव आपल्या दैनंदिन जीवनावर व व्यक्तीमत्वावर होत असतो तसेच आपले ज्ञान वृध्दी ंगत होवून त्याचा उपयोग आपल्या दैनंदिन कामकाजात होत असतो त्यामुळे नियमीतपणे वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. तसेचपोलीसांना त्यांचे कर्तव्य पार पाडत असतांना आपले छंद देखील जोपासले पाहिजे म्हणून पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी आपल्या दैनंदिन कामकाजातून वाचनासाठी थोडा वेळ काढुन नियमीत वाचन केले पाहिजे असे सांगितले.

 

 

 

 

त्याचप्रमाणे पोलीस दलाचे कामकाज हे आव्हानात्मक असून दैनंदिन कामकाज करतांना पोलीसांवर वेगवेगळ्या प्रकारे तणाव येत असतो. त्या शारीरिक व मानसिक तणावातून मार्ग काढून सकस आहार व योग्य व्यायाम याद्वारे आपण व्यार्थीपासून दूर राहू शकतो त्यामुळे दररोज दैनंदिन कामातून वेळ काढून नियमीत व्यायाम केला पाहिजे बाबत मार्गदर्शन केले. तसेच पोलीस ठाण्यात उपलब्ध असलेले वाचनालय, व्यायामशाळा यांचा पोलीस पाल्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी लाभ घ्यावा “असे आवाहनही यावेळी केले.

 

 

 

भेटी दरम्यान नवापूर पोलीस ठाण्यात असलेले सी.सी.टी.व्ही. कॅमेरे यांचा वापर वाढविण्याच्या सूचना देऊन पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले. पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या अडचणीबाबत विचारपूस करुन त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या निश्चितच सोडविल्या जातील असे यावेळी सांगितले.

 

 

त्यानंतर नंदुरबार उप विभागातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व दुय्यम अधिकारी यांच्या मुलाखती घेऊन नंदुरबार शहर, उपनगर, नंदुरबार तालुका, विसरवाडी पोलीस ठाण्याला दाखल गुन्ह्यांचा व पोलीस अधिकारी यांनी वर्षभरात केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला.

 

 

यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी. जी. शेखर पाटील, पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार उपविभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे वाचक पोलीस उप अधीक्षक राजाराम ढिकले, नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, स्थानिक गुन्हे शोखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांचेसह नवापूर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अमंलदार उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

कन्साई परिसरात बिबट्याचा वावर

Next Post

गृहरक्षक दलाच्या कंपनी नायकपदी पावबा मराठे

Next Post
गृहरक्षक दलाच्या कंपनी नायकपदी पावबा मराठे

गृहरक्षक दलाच्या कंपनी नायकपदी पावबा मराठे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

August 16, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

August 16, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add