नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार येथील ग्रामदेवता खोडाई देवीची यात्रा यंदाही कोरोनामुळे भरणार नसुन भाविकांनी नवरात्रोत्सवात गर्दी न करता सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन देवीचे दर्शन घ्यावे . तसेच देवीच्या दर्शनाची ऑनलाइन व्यवस्था करण्यात यावी . खोडाई देवीची यात्रा नसल्याने व्यावसायिक व विविध साहित्य विक्रेत्यांनी येऊ नये . तसेच भाविकांनी देखील दर्शन घेताना गर्दी होणार नाही यांची काळजी घ्यावी असे आवाहन नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी केले आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी धोका टळलेला नाही , यावर्षीचा नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत . दि.७ ते १५ ऑक्टोंबर दरम्यान नवरात्रोत्सव साध्या पध्दतीने नियमांचे पालन करुन साजरा करावा . तसेच गरबा मंडळांना केवळ मुर्ती स्थापनेस परवानगी असून त्यासाठी स्थानिक प्रशासनाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असेल , तर नवरात्रोत्सवात गरबा व दांडीया नृत्य आयोजन करण्यास बंदी असणार आहे . तसेच कोविड १९ चा विचार करता महापालीका व स्थानिक प्रशासनाच्या धोरणानुसार मंडप बाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादीत स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावे . यावर्षी नवरात्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यासाठी घरगुती व सार्वजनिक देवीच्या मुर्तीची सजावट त्याअनुषंगाने करण्यात यावी . देवीची मुर्ती सार्वजनिक मंडळाकरीता ४ फुट व घरगुती करीता २ फुट असावी. देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुक काढता येणार नाही. गरबा दांडीया व इतर सांस्कृतिक आयोजित करता येणार नाही. देवीच्या दर्शनासाठी सुविधा ऑनलाईन केबल नेटवर्क , वेबसाईट व फेसबुक इत्यादीव्दारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी . ध्वनी प्रदुषण नियमांचे तंतोतंत पालन करावे . मंडपात एकावेळी ५ पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी . तसेच मंडपात खाद्यपदार्थ अथवा पेयपानाची व्यवस्था करण्यास मनाई आहे. तसेच दसर्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम सर्व नियम पाळुन करावा. प्रेक्षक बोलवु नयेत . ऑनलाईन , फेसबुक इ थेट प्रक्षेपणाद्वारे हा सोहळा बघण्याची व्यवस्था करावी . नंदुरबार येथील ग्रामदेवता खोडाई देवीची यात्रा यंदाही कोरोनामुळे भरणार नसुन भाविकांनी नवरात्रोत्सवात गर्दी न करता सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन देवीचे दर्शन घ्यावे . तसेच देवीच्या दर्शनाची ऑनलाइन व्यवस्था करण्यात यावी . खोडाई देवीची यात्रा नसल्याने व्यावसायिक व विविध साहित्य विक्रेत्यांनी येऊ नये . तसेच भाविकांनी देखील दर्शन घेताना गर्दी होणार नाही यांची काळजी घेवुन शासनाच्या नियमांनचे मार्गदर्शक सुचनाचे पालन करुन सर्वानी नवरात्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा . असे आवाहन नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी केले आहे.