Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कोळदा गटाची होणार सर्वात आधी मतमोजणी, जिल्ह्यातील मतमोजणी अशी होणार

team by team
October 5, 2021
in राजकीय
0
कोळदा गटाची होणार सर्वात आधी मतमोजणी, जिल्ह्यातील मतमोजणी अशी होणार

नंदुरबार  | प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यातील ११ जिल्हा परिषद गट व १३ पंचायत समिती गणांसाठी उद्या दि.६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेला मतमोजणीस सुरूवात होणार आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांचे प्रतिष्ठापणाला लागली आहे. नंदुरबार येथे १४ टेबलवर २२ राऊंडमध्ये, शहादा येथे १४ टेबलवर १४ राऊंडमध्ये तर अक्कलकुवा येथे १२ टेबलवर ३ राऊंडमध्ये मतमोजणी होणार आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर नंदुरबार जिल्ह्यातील ११ जिल्हा परिषद गट व १३ पंचायत समिती गणासाठी आज दि.५ रोजी शांततेत मतदान पार पडले. उद्या दि.६ ऑक्टोबर रोजी नंदुरबार शहरातील जी.टी.पी. रस्त्यावरील शनिमंदिर समोर वखार महामंडळाचे गोडावूनमध्ये नंदुरबार तालुक्यातील ५ गट व ५ गणांसाठी सकाळी १० वाजेला मतमोजणीस सुरवात होणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज असून सर्वातआधी पोष्टल मतपत्रिकांची मतमोजणी होणार आहे. त्यानंतर इबीएम मशिनद्वारे झालेल्या मतदानाची मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीसाठी प्रशासनातर्फे १४ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. या १४ टेबलवर २२ राऊंडमध्ये मतमोजणी होणार आहे. यात सर्वप्रथम कोळदा गट त्यानंतर खोंडामळी, कोपर्ली, रनाळा, मांडळ या गटांची मतमोजणी होईल. त्यानंतर गुजरभवाली गण, पातोंडा गण, होळतर्फे हवेली गण, नांदर्खे गण व गुजरजांभोली या गणांची मतमोजणी होणार आहे. साधारणपणे दुपारी १२.३० वाजेपर्यंत सर्व निकाल लागणे अपेक्षीत आहे. या निकालांकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे. मतपेटीत मतदारराजाने कोणाच्या पारडयात मतदान केले हे मतपेटी उघडल्यावर कळणार आहे. नंदुरबार तालुक्यातील या मतमोजणीसाठी ४० कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर शहादा तालुक्यातील जि.प. गट व पंचायत समिती गणांसाठी १४ टेबलवर १४ राऊंडमध्ये मतमोजणी होणार आहे. यासाठी ५० कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर अक्कलकुवा तालुक्यातील दोन गटांसाठी १२ टेबलांवर ३ राऊंडमध्ये मतमोजणी होणार आहे. यासाठी ४० कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथील ग्रामदेवता खोडाई देवीची यात्रा यंदा रद्द

Next Post

जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी 67.15 टक्के मतदान

Next Post
जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी 67.15 टक्के मतदान

जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी 67.15 टक्के मतदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add