नंदुरबार l प्रतिनिधी
शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पाठपुराव्यातून विविध विकास कामांसाठी ५ कोटींच्या विशेष निधी नगर विकास विभागाकडून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेला आहे. नंदुरबार शहरासाठी ४ कोटी तर तळोद्यासाठी १ कोटींची विकास कामे करण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नुकतेच शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबार व तळोदा शहरातील विकास कामांसाठी निधी मिळण्यासाठी निवेदन सादर केले होते. मुख्यमंत्र्यांनी निवेदनाची दखल घेत हिरवा कंदील दाखवला असता नगर विकास विभागाकडून ५ कोटींच्या निधी मंजूर करण्यात आला. नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान या योजनेअंतर्गत तळोदा शहरात १ कोटी तर नंदुरबारात ४ कोटींची कामे होणार आहेत. विकास कामांसाठी भरघोस निधी दिल्याबद्दल शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे आभार मानले आहेत.
शिवउद्यान धामसाठी ९५ लाख
माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या शिव उद्यान धामसाठी यापूर्वीच नगर विकास विभागाकडून १ कोटीचा निधी मंजूर झाला होता. आता पुन्हा ९५ लाखाच्या निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
शहरात पुन्हा ३४ शिवालय
सध्या शिव महापुराण कथाकार पं.प्रदीप मिश्रा यांची विशेष क्रेज आहे.नंदुरबार शहरात मोठ्या प्रमाणावर त्यांचे अनुयायी असून, शहरात विविध ३४ वसाहतींमध्ये शिव मंदिर बांधण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे नेते, माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली. त्यासाठी देखील निधी मंजूर झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.