नंदुरबार l प्रतिनिधी
येथील एस.ए.एम इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार नंदुरबार नितीन गर्जे, शालेय समितीचे अध्यक्ष रेव्ह. जे.एच.पठारे, विश्वस्त नूतनवर्षा वळवी, मार्था आक्का सुतार, रेव्ह. अनूप वळवी, इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूलचे मुख्याध्यापक संदेश यंगड, मराठी मीडियम स्कूल मुख्याध्यापिका सुषमा कालू तसेच नंदुरबार नगर परिषदचे उपनगराध्यक्ष रवींद्र पवार आणि पालकवर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला रेव्ह. पठारे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आंतरकुल संचलनानंतर गतवर्षीचे विजेता ग्रीन हाऊसने ट्राॅफी हस्तांतरित केली. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ सुनीता अहिरे यांनी मनोगत व्यक्त केले. शपथविधी नंतर तहसीलदार गर्जे यांनी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन केले.
आठशे मीटर स्पर्धेत विजेता खेळाडूंचा प्रमाणपत्र आणि पदक देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक संदिप पाटील आणि आभार प्रदर्शन शिक्षक बुद्धभूषण पिंपळे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन क्रीडा समिती प्रमुख पर्यवेक्षक सॅबस्टीन जयकर यांच्या मार्गदर्शनानुसार शिक्षक आशिष वळवी आणि अंजय वळवी यांनी केले.








