Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रस्ता सुरक्षेबाबात मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन

team by team
December 15, 2023
in राज्य
0
रस्ता सुरक्षेबाबात मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन

नंदुरबार l प्रतिनिधी

रस्ता सुरक्षेबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी, तसेच विद्यार्थ्यांना वाहतुक नियम, चिन्हे याबाबत माहीती देण्यासाठी नंदुरबार उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रस्ता सुरक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

नंदुरबार तालुक्यातील श्री. आप्पासो. आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय (विखरण), नूतन माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय (खोंडामळी),कृ.दा. गावित शैक्षणिक संकुल (कोरीट) येथे नुकतेच रस्ता सुरक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.

रस्ते अपघात ही भारतातील गंभीर समस्या असून रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्युमध्ये भारताचा जगात पहिला क्रमांक असून दरवर्षी देशात सुमारे पाच लाख अपघात होतात व त्यात सुमारे दीड लाख लोक मृत्युमुखी पडतात. त्यामुळे वाहन चालविताना, रस्त्याचा वापर करताना कशी काळजी घ्यावी यासाठी या मार्गदर्शन शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी रस्ता सुरक्षाबाबत रस्त्यावरुन चालताना घ्यावयाची काळजी, सायकल चालविताना, बसमधून प्रवास करताना, चौक पार करताना घ्यावयाची काळजी तसेच हेल्मेटचे फायदे, सीटबेल्टचे फायदे, घाटात वाहन चालविताना, ओव्हरटेक करताना, वाहन मागे घेताना, रात्री वाहन चालविताना घ्यावयाची दक्षता इत्यादी विषयांवर सहायक मोटार वाहन निरीक्षक पवन धनगर, धोंडीबा आव्हाड व प्रविण रहाणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच रस्ता सुरक्षा मार्गदर्शनपर ‘वाहतुकीची पाठशाळा’ ही पुस्तिका व वाहतूक चिन्हांची पत्रके यांचे वितरण विद्यार्थ्यांना करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. आप्पासो. देवरे विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. डी. साळुंखे तसेच डी. बी. भारती, के. पी. देवरे, एम. जी. नेरकर यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

एस.ए.एम इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन

Next Post

रासेयो स्वयंसेविका गायत्री पाटीलची राष्ट्रीय पथसंचलन करिता निवड

Next Post
रासेयो स्वयंसेविका गायत्री पाटीलची राष्ट्रीय पथसंचलन करिता निवड

रासेयो स्वयंसेविका गायत्री पाटीलची राष्ट्रीय पथसंचलन करिता निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

August 16, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

August 16, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add