नंदुरबार l प्रतिनिधी-
दिल्ली येथील केंद्रीय पथकाने नंदुरबार जिल्ह्याची दुष्काळ पहाणी केली नंदुरबार तालुक्यातील विविध गावांसह दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली त्यात बलदाणे धरणावर अमरावती नाला प्रकल्प या ठिकाणी शेतकरी, ग्रामस्थ व गाव चे प्रथम नागरिक अंकुश पाटील यांनी अधिकाऱ्यांना परिस्थितीची माहिती दिली.
दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शेतकरी व ग्रामस्थांशी केंद्रीय पथकाने संवाद साधला यात शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी पथकाचे सदस्य जगदीश साहो, एच आर खन्ना, यांच्या समावेश होता. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्ह्यातील कृषी अधिकारी ए सी ठाकरे, तहसीलदार नितीन गर्जे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्यांना स्थानिक ग्रामस्थांनी परिसरात असलेल्या धरणाबाबत माहिती दिली यावर्षी समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे धरण कोरडेच राहिले. तसेच तापी बुराई प्रकल्प अनेक दिवसांपासून काम सुरू आहे मात्र अद्याप पूर्ण झाला नाही त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा असे ग्रामस्थांनी सांगितले. यासोबत गुरांच्या पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण होईल असे समितीला सांगितले.








