नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हयात दि.६ ते ९ डिसेंबरदरम्यान कालावधीमध्ये सर्व पोलीस ठाणे हद्दीत ठिकठिकाणी नाकाबंदी करुन दुचाकी, चारचाकी व इतर वाहनांची तपासणी करण्यात आली.दारु पिवून वाहन चालविणारे किरकोळ कारणामुळे कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणतात. अशा इसमांविरुध्द् तसेच दारु पिऊन वाहन चालविणाऱ्या ८६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आगामी सणोत्सव व नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर काहीजण सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करुन शांतता भंग करतात. तसेच मद्यपान करुन वाहन चालविल्यामूळे होणारे अपघात व त्यातील मृतांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच दारु पिवून वाहन चालविणारे किरकोळ कारणामुळे कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणतात.
अशा इसमांविरुध्द् तसेच दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात विशेष मोहिम राबवून कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्यानुसार गेल्या चार दिवसांत ८६ मद्यपी दुचाकी चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून कारवाई करण्यात आली आहे. जिल्हयात दि.६ ते ९ डिसेंबरदरम्यान कालावधीमध्ये सर्व पोलीस ठाणे हद्दीत ठिकठिकाणी नाकाबंदी करुन दुचाकी, चारचाकी व इतर वाहनांची तपासणी करण्यात आली. नाकाबंदीदरम्यान एकुण ८६ वाहन चालकांनी मद्यप्राशन केलेले असल्याचे आढळुन
आले. त्यामुळे त्यांचे विरुध्द् नंदुरबार शहर पोलीस ठाणे-८, उपनगर ४, नंदुरबार तालुका ५, नवापूर ७, विसरवाडी ४, शहादा १०, धडगांव ३, म्हसावद ५, सारंगखेडा २, अक्कलकुवा २२, तळोदा पोलीस ठाणे ६, मोलगी ४, शहर वाहतुक शाखा ६ असे एकुण ८६ गुन्हे संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरुध्द राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मद्यपान करुन वाहन चालवितांना आढळून आलेल्या वाहन चालकांचे परवाने (लायसन्स) निलंबन करण्याचे प्रस्ताव उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार यांचे कार्यालयात पाठविण्यात येणार असुन लवकरच त्यांच्यावर परवाने (लायसन्स) निलंबनाची कारवाई करण्यात येईल. नाकाबंदीसाठी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, दत्ता पवार, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांचेसह सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी तसेच पोलीस अमंलदार यांनी सहभाग घेतला.








