नंदुरबार l प्रतिनिधी
भालेर ग्रामपंचायतीवर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या झेंडा फडकला असून, सरपंचपदी वैशाली दिनेश पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीनंतर शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी सत्कार केला.
नंदुरबार तालुक्यातील भालेर ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीसाठी विशेष सभेचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते. नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली होती. या विहित वेळेत सरपंचपदासाठी वैशाली दिनेश पाटील यांनी एकमेव अर्ज दाखल केला. त्यानंतर निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. प्राप्त अर्जाची छाननी केली असता अर्ज वैध ठरवण्यात आल्यानंतर दुपारी २ वाजता सभा घेण्यात आली.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वैशाली पाटील यांच्या एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने सरपंचपदी निवड झाल्याचे जाहीर केले. निवड प्रक्रिया नंतर शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी सत्कार केला.यावेळी शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील, ज्येष्ठ नेते भास्कर पाटील, जि.प देवमन पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रमसिंह वळवी,शिवसेनेचे तालुकाप्रमुख डॉ.सयाजीराव मोरे, सुनील पाटील,
शेतकरी सहकारी संघाचे संचालक किशोर पाटील,नवीन बिर्ला, इंजि.अनिल पाटील,मधुकर पाटील,भैय्या राजपूत, उपसरपंच गजानन पाटील, जिजाबाई पवार,सिंधुबाई पाटील,पंडित भील, दिपाली भील, कविता पाटील, शोभा पाटील, जागृती पाटील, पुरुषोत्तम पाटील, सुमनबाई भिल आदी उपस्थित होते.








