नंदुरबार l प्रतिनिधी
राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस येणार्या भविष्यातील काळात शहरातील प्रत्येक वार्डात, जिल्ह्यातील प्रत्येक गावात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस संघटन हे मजबूत करणार आहे तसेच तळागळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून त्यांच्या अडीअडचणी समजून घेणार व सोडवणार आहे. तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस मध्ये सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना कार्यकर्त्यांना सामावून घेतले जाईल व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पक्षाचे विचार कसे पोहोचतील याकडे लक्ष दिले जाईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांनी केले.
राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसची नंदुरबार जिल्हा आढावा बैठक तसेच विद्यार्थी मेळावा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार नगर पालिका अटल बिहारी वाजपेयी सभागृह येथे पार पडली. बैठकीस राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, युवा नेते राऊ मोरे, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे नाशिक विभागीय अध्यक्ष प्रसाद सोनवणे, प्रदेश मुख्य सरचिटणीस विशाल विहिरे, नंदुरबार युवक जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा,
आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष गुलाब नाईक, डॉक्टर सेलचे अध्यक्ष नितीन पवार, रवींद्र वळवी, चिंतामण पाटील, सुरेंद्र कुवर, संजस खंडारे, जितेंद्र कोकणी, सुरेश महिरे, रविंद्र जावरे, नंदुरबार शहराध्यक्ष लल्ला मराठे, जयंत मोरे, अमित शेवाळे, कालू पहेलवान, लाला बागवान, जितू ठाकरे, समीर शेख, अदनान मेमन, भुषण पाटील, छोटू कुवर, चेतन पाटील, राजा ठाकरे, निलेश चौधरी, अनमोल पाडवी, आकाश गावीत आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन बबलू कदमबांडे यांनी केले.








