नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्रातील संभाजीनगर येथे जप्त झालेला आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रग्स साठा हस्तगत करण्यात गुजरात पोलिसांना यश आले.या धडक कारवाईत मूळचे नंदुरबारचे सुपुत्र असलेले व सध्या आमदाबाद गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त चैतन्य मंडलिक यांचे राज्य कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी अभिनंदन करीत कौतुक केले आहे.
प्राप्त माहितीनुसार काही दिवसांपूर्वी आमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेने एमडी ड्रगसह एकाला पकडले. त्यांनी आरोपीची झाडाझडती घेतली. या आरोपींनी दिलेल्या माहितीवरून पोलीस ड्रगच्या रॅकेटचा शोध घेत होते. चौकशी दरम्यान पोलिसांना एक फोन नंबर मिळाला. पोलिसांनी तो नंबर तांत्रिक निगराणीखाली ठेवला.सुरत मधील जितेश हिनहोरीया याचा हा फोन नंबर होता. संबंधित क्रमांकावर कोणाकोणाचे फोन येतात. त्याच बरोबर कोणाला फोन केले जातात. त्यांच्यात काय संभाषण होते. ही सर्व माहिती पोलिसांना मिळाली.
त्यावरून हितेश हा छत्रपती संभाजीनगर मध्ये कारखान्यात ड्रगचे उत्पादन करतो व तेथून मुंबई मध्य प्रदेश, गुजरात येथे पाठवतो हे उघड झाले.ही माहिती शहरात आलेल्या पोलिसांच्या पथकाने आमदाबाद गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त चैतन्य मंडलिक यांना कळविली.त्यानुसार संभाजी नगरात 25 दिवस तळ ठोकून गुजरात पोलिसांनी सर्च ऑपरेशन करीत 500 कोटींचे ड्रग्स जप्त केले.चैतन्य मंडलिक हे नंदुरबार येथील निवृत्त पाटबंधारे अभियंता रवींद्र मंडलिक यांचे सुपुत्र आहेत.








