शहादा | प्रतिनिधी
शहादा पोलिस व डी.बी. पथकाने सापळा रचून १ लाख ८० हजारांची दारू व चार लाखाचे वाहन असा ५ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी दिली.
सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोट निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे बुथ चेक करत असतांना गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर येथून डोंगरगाव मार्गे तळोदा येथे एका वाहनातून दारू जात आहे, अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानुसार शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक व पोलिस कर्मचार्यांनी सापळा रचून १ लाखांची हजाराची दारू व चार लाखाचे वाहन असा एकूण ५ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.