Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

लोणखेडा येथे अल्पवयीन बालकाकडुन अवैध गावठी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुस जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची कारवाई

team by team
October 3, 2021
in क्राईम
0
लोणखेडा येथे अल्पवयीन बालकाकडुन अवैध गावठी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुस जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची कारवाई
नंदुरबार | प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील लोणखेडा चौफुलीवरून अल्पवयीन बालकाकडुन २५ हजाराचे १ अवैध गावठी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जप्त केले.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती पोट निवडणुक  व नवरात्रौत्सव दरम्यान समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर अंकुश राहावा तसेच निवडणूका व सण उत्सव भयमुक्त वातावरणात पार पाडावेत यासाठी खबरदारी म्हणून पोलीस उप महानिरीक्षक , नाशिक परिक्षेत्र , नाशिक यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती पोट निवडणुकीच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा भेटी दरम्यान अवैध शस्त्रांवर कारवाई करण्याच्या सुचना दिलेल्या होत्या . तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक  पी . आर . पाटील यांनी देखील स्थानिक गुन्हे शाखेला अवैध शस्त्रांवर कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले होते . त्या अनुषंगाने दि.२ ऑक्टोंबर रोजी शहादा पोलीस ठाणे हद्दीतील लोणखेडा चौफुलीवर एक इसम विना परवाना लोखंडी बनावटीचे गावठी कट्टा कब्जात बाळगुन संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना मिळाल्याने त्यांनी शहादा पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असलेले स्थानिक गुन्हे शाखेतील पोहवा दिपक गोरे , पोकॉ मोहन ढमढेरे , पोकॉ विजय ढिवरे यांचे पथक रवाना केले. शहादा पोलीस ठाणे हद्दीतील लोणखेडा चौफुलीवर जावुन संशयीत इसमाचा शोध घेतला असता एका बंद कोल्ड्रींक्सच्या दुकानासमोर एक अल्पवयीन मिळुन आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास ताब्यात घेवुन त्याची झडती घेतली असता त्याचे कब्जात २५ हजार रुपये किमंतीचे एक गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल व एक पिवळ्या धातुचे जिवंत काडतुस मिळुन आल्याने त्याच्या विरुध्द शहादा पोलीस ठाण्याला भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . सदर कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणार्‍या गुन्हेगारांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झालेले असुन भविष्यात कोणी अवैध शस्त्र जवळ बाळगल्यास त्यांची गय केली जाणार नाही , असा नंदुरबार जिल्हा पोलीसांकडुन इशारा दिलेला आहे . सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक  पी . आर . पाटील यांच्या नेतृत्वाखाली  अपर पोलीस अधीक्षक विजय पवार , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , पोलीस हवालदार दिपक गोरे , पोलीस नाईक मोहन ढमढेरे , पोलीस अमंलदार विजय ढिवरे यांनी केली आहे .
बातमी शेअर करा
Previous Post

शहादा येथे दोन लाखांची दारु जप्त, दोघांना अटक

Next Post

पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी रात्रभर फिरून जिल्ह्यात राबविले कोंबींग आपरेशन, ४७ गुन्हेगारांना अटक, टँकर चोरीही उघडकीस, गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

Next Post
लोणखेडा येथे अल्पवयीन बालकाकडुन अवैध गावठी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुस जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची कारवाई

पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी रात्रभर फिरून जिल्ह्यात राबविले कोंबींग आपरेशन, ४७ गुन्हेगारांना अटक, टँकर चोरीही उघडकीस, गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

April 28, 2026
अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

April 28, 2026
शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

April 28, 2026
गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

April 28, 2026
डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add