नंदूरबार l प्रतिनिधी
एस.ए.एम. ट्रस्ट नंदुरबार संचलित एस. ए. मिशन हायस्कूल येथे महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली, ह्या निमित्ताने शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळेचा परिसर स्वच्छ केला.
यावेळी कार्यक्रमानिमित्त नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, माझी वसुंधरा माझी अभियानचे समन्वयक राजेश परदेशी, शाळेच्या प्राचार्य सौ
नूतनवर्षा वळवी, उपमुख्याध्यापक व्ही.आर.पवार, पर्यवेक्षक एम.एफ.वळवी,पर्यवेक्षक सि.पी बोरसे, ज्येष्ठ शिक्षक ए.आर.गर्गे आदी उपस्थित होते, यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे व राजेश परदेशी यांचा सत्कार शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन शाळेच्या प्राचार्य सौ.नूतनवर्षा वळवी यांनी केला.यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक सादर करताना गौतम सोनवणे यांनी गांधीजींच्या आयुष्यातील स्वच्छतेचे महत्त्व आणि लालबहादूर शास्त्री यांनी 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये पंतप्रधान असताना शास्त्रीजींनी बजावलेली महत्त्वाची भूमिका आपल्या प्रास्ताविकात मांडली, या कार्यक्रमातील मुख्य आकर्षण बिंदू ठरले,गांधीजींची वेशभूषा परिधान केलेला इ.८ चा विद्यार्थी चैतन्य पाटील. तसेच मंचावर महात्मा गांधीजींची आणि अहिंसेचे प्रतिक असलेले गांधीजींचे तीन माकड, आणि गांधीजींचा चरखा ह्या प्रतिमेंमुळे मंचाची सजावट आकर्षक दिसत वाटत होती . यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या शिक्षकांनी “साबरमती के संत तुने कर दिया कमाल” हे समूहगीत मान्यवरांसमोर सादर केले, त्यानंतर इ.६ वी च्या रिद्धेश नांद्रे या विद्यार्थ्याने गांधीजींचा जीवनपट आणि त्यांचे विचार सादर केले तर कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रुती पवार हीने “स्वच्छ व स्वस्थ भारत” यावर आपलं वकृत्व सादर केलं, यानंतर स्वच्छ व स्वस्थ भारत या विषयावर स्वरचित काव्यवाचन कु.दिव्या निरंजन वसईकर, स्वाती दिलीप पावरा, अंजली अरुण चौधरी या विद्यार्थ्यांनीद्वारे सादर करण्यात आले. यानंतर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या जयंती निमित्त स्वच्छतेवर नाटिका सादर केली.यामध्ये विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी, भारत माता, पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी, डॉक्टर, पोलीस कॉन्स्टेबल, अशा विविध व्यक्ती रेखा साकारल्या या नाटकाचा उद्देश स्वच्छ भारत व स्वच्छ भारत अभियानांतर्गत वसुंधरा वाचवण्याचा संदेश देणे हा होता. यापुढील कार्यक्रमात इयत्ता पाचवी व सहावी च्या बाल कलाकारांनी स्वच्छतेबद्दल संदेश दिला.यामध्ये 30 विद्यार्थ्यांच्या समूहाने सहभाग नोंदवला, यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये प्रमुख पाहुणे राजेंद्र शिंदे यांच्या हस्ते विविध स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी श्री.शिंदे यांनी आपले मनोगत सादर करताना म्हणाले की, कार्यक्रमाचे आयोजन आणि मुलांचा उत्साह बघून मन अत्यंत भारावून गेले इतक्या लहान वयात मुलं भाषण आणि नाटकाद्वारे जे संदेश पोहोचवत आहे, ह्या विद्यार्थ्यांना सुद्धा इतक्या लहान वयातच कर्तव्याची जाणीव आहे म्हणून विविध नाटिका, वकृत्व, काव्यवाचन संदर्भात भूमिका उत्तमरीत्या करू शकले ह्या विद्यार्थ्यांचे भविष्य अत्यंत उज्ज्वल असेलच यात दुमत नाही, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती नूतन पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनीता पवार यांनी मानले.