नवापूर l प्रतिनिधी
नवापूर नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्र 10 मधील देवळफळी भागात रस्त्याची अंत्यत दयनीय अवस्था झाली आहे. नगरसेवक तथा विद्यमान उपनगराध्यक्ष विश्वास बडोगे, अँड. अमित कांबळे,विजय कोकणी यांच्या नेतृत्वाखाली गांधीगिरी करत प्रभागातील नागरिकांनी स्वखर्चाने येथील खड्डे भरून संबंधित विभागा बाबत आक्रोश व्यक्त केला आहे
राष्ट्रीय महामार्गला लागून औदयोगिक वसाहत ला जोडणारा एकमेव रस्ता असल्याने अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणारा हा रस्ता गेल्या अनेक वर्षा पासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे नगर परिषद हद्द असल्याने ह्या रस्त्याकडे नगर पालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग हे दोघं विभाग कानाडोळा करत दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनात येत आहे. पावसाळ्या पूर्वी रस्ता दुरुस्ती करणे अनिवार्य असतांना प्रशासना कडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचे बघून स्थानिक नागरिकांनी प्रभागचे नगरसेवक विश्वास बडोगे यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती चे औचित्य साधत अनोखे आंदोलन करत खड्डे भरत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.यावेळी राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण काम प्रगती पथावर असल्याने प्रभाग 10 मधील जवळ जवळ 67 घरे बाधित होणार आहे या कुटूंबावर बेघर होण्याची पाळी आली असल्याने स्थानिक नागरिकांनी 67 कुटूंबाना विस्थापित करण्याची मागणीसाठी बेघर होणारे कुटूंब प्रमुखांनी आपली व्यथा मांडली ह्या वेळी उपनगराध्यक्ष विश्वास बडोगे यांनी बेघर होणाऱ्या कुटूंबा साठी प्रशासनाच्या अधिकारी सोबत पत्रव्यवहार सुरू असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनानुसार चर्चा करणार असल्याचे सूतोवाच करत जमलेल्या बाधित होणाऱ्या कुटंबांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन देत त्यांच्या साठी वेळ पडली तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांचा मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ,पो हे का निजाम पाडवी,चंद्रशेखर चौधरी,आदी चोख बंदोबस्त ठेवला होता.