नंदुरबार| प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील सेवानिवृत्त सहा. पोलीस उपनिरीक्षक यांच्या खिशातुन जबरी चोरीच्या करणार्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरत येथुन अटक केली असुन गुन्ह्यातील मुद्देमाल झारखंड येथुन ताब्यात घेतला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.२७ डिसेंबर २०२० रोजी संध्याकाळी ४ वा. सुमारास नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील सेवानिवृत्त सहा. पोलीस उपनिरीक्षक अशोक नवल धनगर रा. गंधर्व नगरी, नंदुरबार हे त्यांच्या खाजगी मोटारसायकलने दोंडाईचा गावाकडुन नंदुरबारकडे येत असतांना न्याहली ता.जि. नंदुरबार या गावाजवळ त्यांची मोटार सायकलने जात असतांना दोन अज्ञात इसमांनी अशोक नवल धनगर यांच्या खिशात ठेवलेला १४ हजार ५०० रुपये किमतीचा मोबाईल जबरीने काढुन घेतला, म्हणून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नंदुरबार जिल्ह्याचे नुतन पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हे बैठकीत नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत दाखल असलले मालमत्तेविरुध्दचे ना उघड गंभीर गुन्हे उघडकिस आणण्याबाबत सुचना देवुन मार्गदर्शन केले.
वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे सन २०२० मध्ये जबरी चोरीचा दाखल असलेला एक गुन्हा अद्याप ना उघड असल्याबाबत दिसुन आले. त्यामुळे त्यांनी गुन्ह्याचा सखोल अभ्यास करुन चोरीस गेलेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने एक पथक झारखंड येथे रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने झारखंड राज्यात जावुन सदरचा चोरी झालेला मोबाईल हस्तगत केला. तसेच सदरचा गन्हा हा सूरत मधील आरोपींनी केला असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आपला मोर्चा गुजरात राज्यातील सुरत येथे वळविला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरत गुजरात येथे जावुन हितेश राजूभाई मेवाडा रा. १४७, संत कृपा सोसायटी, गोडोदरा, ता.जि.सुरत यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने आरोपीतास ताब्यात घेवुन पुढील कारवाईकामी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, नंदुरबार पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद कळमकर. पोलीस हवालदार महेंद्र नगराळे, रविंद्र पाडवी,पोलीस नाईक, विशाल नागरे,मोहन साहले यांच्या पथकाने केली आहे.