नंदूरबार l प्रतिनिधी
मोलगीचा (चनवाईपाडा)) येथे अल्पवयीन युवतीवर अत्याचार करुन तिला जीवे ठार मारण्यात आले या प्रकरणात योग्य तपास होऊन इतर आरोपींना अटक केली जात नसल्याच्या निषेधार्थ दि.27 सप्टेंबर रोजी अक्कलकुवा येथे पोलीस उप अधिक्षक कार्यालया समोर विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वाखाली अंकलेश्वर बऱ्हाणपूर महा मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.दरम्यान रास्ता रोको आंदोलनामुळे अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे.
मार्गावरील वाहतुकीचे नियमनासाठी व रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतुकीची होणारी कोंडी टाळण्यासाठी तसेच काही अनुचित प्रकार घडू कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरिता सार्वजनिक हिताचा दृष्टीकोनातून व कायदा व सुव्यवस्थेची बाब विचारात घेता वरील मार्गावरील वाहतूक आहे. वळविणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी मनिषा खत्री यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (s) व मोटार वाहन अधिनियम, 1988 चे कलम 115 अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करण्यात येवून वरील बाब विचारात घेता दिनांक 27 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते रास्ता रोको आंदोलन संपे पर्यंत अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावरील तहसिल कार्यालय, अक्कलकुवा समोरील मुख्य रहदारी रस्त्यावरील वाहतूक खालील मार्गावरून वळविणेबाबत आदेशीत केले आहे.
असा असेल मार्ग
सागबाराकडून तळोदाकडे जाणारी वाहने खापर येथून ब्राम्हणगांव, गंगथा, फुलवाडीमार्गे कुकरमुंडा फाट्याकडे आणि तळोदाकडून खापरकडे जाणारी वाहने कुकरमुंडा फाटा, फुलवाडी, गंगथामार्गे खापरकडे.
नंदुरबार- निझरकडून जाणारी वाहने फुलवाडी, गंगथामार्गे खापर व खापरकडून निझर-नंदुरबारकडे
जाणारी वाहने खापर, गंगथा, फुलवाडीमार्गे निझर-नंदुरबारकडे. सदर ओदशात नमूद मार्गावरील वाहतूक वळविणेबाबत उपप्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी व दक्षता घेण्यात यावी. त्याचप्रमाणे रास्ता रोको आंदोलनाच्या ठिकाणी व वाहतुक वळविणेत आलेल्या ठिकाणी आवश्यक ते पथक, बॅरेकेटींग, दिशा दर्शक फलक यासह योग्य तो पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात यावा असा आदेश जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी दिला आहे.








