नंदुरबार l प्रतिनिधी
बिलाडी रोड ईदगाह मैदान परिसरात 4 व 5 ऑक्टोंबर 2021 या कालावधीत 49 महाराष्ट्र बी.एन.एनसीसी यांचे मार्फत एनसीसी कॅडेटसाठी गोळीबार सराव घेण्यात येणार असल्याने पोलीस अधिकारी-कर्मचारी व एनसीसी कॅडेट्स तसेच प्रशिक्षक यांचेव्यतिरिक्त प्रतिबंधीत क्षेत्रात वरील कालावधीत कोणालाही प्रवेश करता येणार नाही. परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील तसेच जिवित अथवा वित्तहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी कळविले आहे.