नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा कॉंग्रेस कमिटी तसेच मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड तर्फे जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या सरकार व पोलीस प्रशासना विरोधात निवेदन देण्यात आले.
यावेळी वेळी पोलीस प्रशासनाचा निषेध करत जालना एसपींना बडतर्फ करण्याची तसेच त्यांना आदेश देणारे राज्याचे गृहमंत्री फडणविस यांचा निषेध करत राजीनाम्याची मागणी आली.
निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाज अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगतोय,मुलांचं शिक्षणासाठी लागणारा भरमसाठ पैसा नसल्याने मुलं शिक्षणापासून वंचित रहात आहेत.त्यांना आरक्षणाचा लाभ मिळाल्यास ते स्वत:ची परिस्थिती सुधारू शकतील व राष्ट्राच्या प्रगतीत ही योगदान देऊ शकतील.महाराष्ट्रात मराठा समाजाने आरक्षणाकरीता लाखोंचे मोर्चे अगदी शिस्तीत आणी शांततेत काढलेत.आता ही तिथं शांततेत आंदोलन सुरु असतांना पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी चार्ज मुळे मुलं स्त्रिया माणसांची डोकी फुटली,डोळे फुटलेत,कान फुंकले इतका भिषण लाठीचार्ज केल्यामुळे,पोलीस प्रशासन व सरकार विरोधात जनभावनांचा संताप अनावर झाला आहे.भाजपानेच मराठा आरक्षणाचा वाद चिघळला,आरक्षण न देण्यामागे संघ भाजपा सरकारचाच हात आहे,हे सिध्द झाले आहे असा आरोप निवेदनातून करण्यात आला.
निवेदन देताना कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष पाटील,जिल्हा कॉंग्रेसचे राजेंद्र पाटील.पंडीतराव पवार, देवाजी चौधरी, खंडेराव पवार,अशोक पाटील,नईमोद्दीन शेख. स्वयंरोजगार सेलचे जिल्हाध्यक्ष मोतीलाल ठाकूर, शहराध्यक्ष रऊफ शहा,प्र.उपाध्यक्ष शांतीलाल पाटील, श्रीमती. टि.आर.खान, पावला सरपंच.सौ.स्मिता वळवी,देवराज नंदुरबार मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष नरेंद्र पाटील ,,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सम्राट बिऱ्हाडे,किशोर बाविस्कर,सचिन बैसाणे, यांच्यासह नंदुरबार व जिल्ह्यातील कॉंग्रेस,पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष उपस्थित होते.








