Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तापी बुराई उपसा सिंचन योजना २३ वर्षांपासून रखडली, 24 गावातील ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

team by team
September 7, 2023
in राजकीय
0
तापी बुराई उपसा सिंचन योजना २३ वर्षांपासून रखडली, 24 गावातील ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्याच्या पूर्व पट्ट्यात तापी बुराई उपसा सिंचन योजना २३ वर्षांपासून रखडली आहे. या प्रकल्पाला गती मिळाली नाही तर येत्या १२ सप्टेंबर रोजी तालुक्यातील वटबारे येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रनाळेसह परिसरातील २४ गावांच्या ग्रामस्थांनी दिला.
 निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खंदारे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नंदूरबार तालुक्यातील पूर्व पट्टयात सिंचनासाठी  तापी उपसा सिंचन प्रकल्प सन १९९९ पासून सुरू असून कामे अपूर्ण स्थितीत आहे. वेळोवेळी रास्ता रोको आंदोलन, लोकप्रतिनिधी व प्रशासनाला अनेक वेळा निवेदन देऊन २३ वर्षे पूर्ण होऊनही कोट्यवधींचा निधी खर्चूनही प्रकल्प पूर्ण न झाल्यामुळे नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांची पाण्यासाठी दयनीय अवस्था झाली आहे.
आज जी भयंकर दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे त्यास केवळ प्रशासन व लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाला असता तर अनेक गावातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटला असता.. त्यामुळे आज कदाचित शेतकऱ्यांना दुष्काळाची झळ पोहोचली नसती. त्यामुळे- मागणीची दखल न घेतल्यास तापी बुराई पाइपलाइन जवळ १२ सप्टेंबर रोजी वडबारे रस्त्यावर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

मराठा आरक्षण आंदोलकांवर लाठीचार्ज, जिल्हा कॉंग्रेसतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Next Post

राज्यातील आदिवासी दिव्यांगांच्या वैद्यकीय उपचार व शस्रक्रियांचा खर्च शासनामार्फत करणार : डॉ विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add