Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

स्व.डॉ.हरि नरके म्हणजे पुरोगामी विचारधारेचे चालतं-बोलतं विद्यापीठ, विविध सामाजिक संघटनांकडून शोकसंदेश

team by team
August 16, 2023
in राजकीय
0
स्व.डॉ.हरि नरके म्हणजे पुरोगामी विचारधारेचे चालतं-बोलतं विद्यापीठ, विविध सामाजिक संघटनांकडून शोकसंदेश

नंदूरबार l प्रतिनिधी

 

बहुजन चळवळीचे अष्टपैलू व्यक्तीमत्त्व ज्येश्ठ विश्‍लेषक स्व.प्रा.डॉ.हरि नरके यांना येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिराच्या प्रांगणात शोकसभेद्वारे अभिवादन करण्यात आले. डॉ.हरि नरके यांचे नुकतेच दि.९ ऑगस्ट २०२३ रोजी निधन झाले.

 

शोकसभेत नंदुरबार नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अमोल बागूल यांनी दिवंगत नरके  यांच्या सोबतच्या सहवासातील कथित अनुभव आणि त्यांची कोणताही मुद्दा प्रमाणासह सिद्ध करण्याची क्षमता, डॉ.पितांबर सरोदे यांनी नरके सरांची विद्वत्ता व ग्रंथ संपदा तसेच मराठीला अभिजीत भाषेचा दर्जा देणेकामी त्यांनी केलेले अथक प्रयत्न, तळोद्याचे देविदास शेंडे यांनी डॉ.नरके यांचा संविधानाचा गाढा अभ्यास व आरक्षण म्हणजे प्रतिनिधीत्त्व याची स्पष्ट व्याख्या, बामसेफचे संजय मोहिते यांनी सद्यस्थितीत सत्यशोधनाची आजच्या स्थितीतील निकड, डॉ.सी.डी.महाजन यांनी फुले-शाहू-आंबेडकर यांचेतील नरके यांची समन्वयक भुमिकेतील त्यांचे ज्ञान, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सुलभा महिरे यांनी मिडीया समोर मुद्दे मांडण्याची सरांची हातोटी आणि मिडीयाने त्यांच्याकडे केलेले दुर्लक्ष,

 

 

 

इंजि.रामकृष्ण मोरे यांनी पुणे विद्यापीठाचे नाव बदलून सावित्रीबाई फुले विद्यापीठ असा नामविष्कार करण्यात सरांचे योगदान, राजेंद्र वाघ यांनी अ.भा.महात्मा फुले समता परिषद यातील त्यांचा महत्त्वाचा वाटा आणि संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद भुषविण्याची सरांची पद्धत, प्रा.विलास पंडीत यांनी त्यांची संशोधक व विश्‍लेषक वृत्ती आणि विद्वत्ता यांचे कथन करुन प्रकाशझोत टाकला. तसेच माजी नगरसेवक जगन्नाथ माळी, निंबा माळी, एजाज बागवान, गोपाळ महाजन यांनी देखील शब्दसुमनांनी श्रद्धांजली अर्पण केली.

 

 

यावेळी मधुकर माळी, नरेंद्र जाधव, गोरखनाथ महाजन, मनोज गायकवाड, दत्तू सुळ, भटू महाले, पितांबर खैरनार, मुजम्मील हुसेन, प्रफुल सुर्यवंशी, डॉ.मिजानु रहेमान, हितेश जाधव, महेंद्र पाटील, गोपाळ महाजन, हिरालाल महाजन, अशोक महाजन, सुरेश वाडीले, मनोहर माळी, हंसराज महाले (तळोदा), मुकेश कापुरे, डॉ.वासुदेव माळी, अशोक धनगर, सुकदेव महाजन, डॉ.राजेश मेश्राम, ए.पी.शिरसाठ, सुरेश जावरे, संजय सुर्यवंशी, बारकु शिरोळे, ए.आर.निकम, यशवंत शिंदे, एस.आर.मुके, जी.एस.मोरे, निशांत शिंदे, प्रवीण खरे, नागसेन पेंढारकर, गोरख माळी, बी.एस.पवार, डॉ.मधुकर पाटील, श्रीराम दाऊतखाने, चंदर भोई, संजय माळी, अर्जुन हटकर, डॉ.गणेश भोई यांच्यासह जिल्ह्यातील तळोदा, शहादा येथील प्रतिनिधी अ.भा.महात्मा फुले समता परिषद, सत्यशोधक समाज, सावता फुले संघटना, राष्ट्रसेवा दल, बामसेफ महासंघ, भटके विमुक्त हक्क परिषद, संत भिमा भोई सेवा संस्था, माहिती अधिकार संघ, ईस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशन, तसेच शासकीय निमशासकीय खाजगी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील सेवेतील अधिकारी, प्रतिनिधी, सेवक वर्ग यांचे प्रतिनिधी हजर होते.

 

अभिवादन सभेचा प्रारंभ अखंड सत्य धर्म प्रार्थना अरविंद खैरनार (औरंगाबाद) यांचेकडून सादर करुन करण्यात आली. तर समारोप संविधानाची प्रास्ताविका सुनिल महिरे यांचेकडून प्रतिज्ञेवरुन वाचन करुन करण्यात आला. सभेचे संयोजन मधुकर माळी, जगन्नाथ माळी, नरेंद्र जाधव यांनी तर संचलन रामकृष्ण मोरे यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या लाभार्थींसाठी मोबाईल ॲप तथा व्हॉट्स ॲप हेल्पलाईन

Next Post

लायन्सच्या रंगदे तिरंगा स्पर्धेने देशभक्तीचा जागर

Next Post
लायन्सच्या  रंगदे तिरंगा स्पर्धेने देशभक्तीचा जागर

लायन्सच्या रंगदे तिरंगा स्पर्धेने देशभक्तीचा जागर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add