Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

लायन्सच्या रंगदे तिरंगा स्पर्धेने देशभक्तीचा जागर

team by team
August 16, 2023
in राज्य
0
लायन्सच्या  रंगदे तिरंगा स्पर्धेने देशभक्तीचा जागर
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील लायन्स क्लब व नंदुरबार नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने  देशभक्ती गीता वरील समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रमुख पाहून म्हणून नगर पालिकेचे मुख्याधिकारी  अमोल  बागुल,माजी सैनिक संजय रणयेवले,सखाराम पाटील, नाना भाऊ मोरे,  पंकज वाणी, प्रल्हाद पाटील, अशोक वाघ, अरुण मराठे, मुकुंद राळेगावकर, प्रवीण वसईकर,लायन्स क्लबच्या रिजन चेअरपर्सन हिना रघुवंशी, नेशन फर्स्ट डिस्ट्रिक चेअरपर्सन सुप्रिया कोतवाल, सर्व्हिस वीकच्या डिस्ट्रिक चेअरपर्सन डॉ.तेजल चौधरी,लायन्स क्लब अध्यक्ष  शत्रूघ्न बालाणी, लायन्स फेमिना अध्यक्षा सीमा मोडक, शहर पोलिस निरीक्षक  रवींद्र कळमकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला  दिप प्रज्वलन,भारत माता पूजन,बाल शहीद शिरीषकुमार व श्री नटराज पूजन करण्यात आले. माजी सैनिक व पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.यानंतर विद्यार्थ्याच्या लहान ,मोठा गट व शिक्षक गट मिळून 26 समूह नृत्य सादर झाले.यास्पर्धेत लहान गटात प्रथम अहिंसा इंटर नॅशनल स्कूल,द्वितीय चावरा इंग्लिश मिडीयम स्कूल,तृतीय  एस ए मिशन इंग्लिश स्कूल, मोठ्या गटात  प्रथम श्रॉफ हायस्कूल, द्वितीय  अनु जाती व नव बौद्ध मुलींची शासकिय  निवासी  शाळा, तृतीय डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल,तर शिक्षक गटात प्रथम चावरा इंग्लिश मिडीयम स्कूल, द्वितीय अभिनव विद्यालय, तृतीय  मदर टेरेसा इंग्लिश मिडीयम चे संघ विजयी झालेत.
सर्व विजेत्या संघाना माजी  आमदार  चंद्रकांत रघुवंशी व अमोल बागुल यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आली. परिक्षणाचे काम  सुरज पटले व बिन्नी शर्मा यांनी केले. या कार्यक्रमात डॉ संदीप बोरसे यांनी सर्व शाळेतील डान्स टीचर ,पालक व लायन्स सदस्य यांना एकत्र घेवून एक उत्स्फूर्त सादरीकरण केले त्याला विद्यार्थी वर्गाकडून खूप प्रतिसाद मिळाला. या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनल म्हसावदकर, डॉ. गौरी बोरसे, चेतना गोस्वामी यांनी केले.
या कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन प्रोजेक्ट चेयरम न डॉ. संदीप बोरसे ,लायन्स क्लब सचिव आश्विन पाटील, कोषाध्यक्ष शंकर रंगलानी, फेमिना क्लब  सचिव रागिणी पाटील, कोषाध्यक्ष जया जैन यांचे सह दोन्ही क्लब सदस्यांनी केले.या  स्पर्धासाठी सर्व विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा, तिरंगा झेंडा, विविध रंगाच्या ओढण्या घेवून सादरीकरण केले व प्रत्येक सादरीकरण नंतर देशभक्ती पर घोषणा  यामुळे देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.लायन्स परिवाराने शालेय विद्यार्थ्यांमध्ये देश भक्ती जागवणारा उपक्रम घेतल्या बद्दल समाजातून क्लब चे कौतुक होत आहे .
बातमी शेअर करा
Previous Post

स्व.डॉ.हरि नरके म्हणजे पुरोगामी विचारधारेचे चालतं-बोलतं विद्यापीठ, विविध सामाजिक संघटनांकडून शोकसंदेश

Next Post

राष्ट्रवादीतर्फे खा. सुप्रिया सुळे यांना निष्ठेचे प्रतिज्ञापत्र सुपूर्त

Next Post
राष्ट्रवादीतर्फे खा. सुप्रिया सुळे यांना निष्ठेचे प्रतिज्ञापत्र सुपूर्त

राष्ट्रवादीतर्फे खा. सुप्रिया सुळे यांना निष्ठेचे प्रतिज्ञापत्र सुपूर्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add