Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तोरणमाळ आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा मृत्यूने खळबळ, मुख्याध्यापकसह कर्मचाऱ्यांवर चौकशी करून कारवाईची मागणी

team by team
August 10, 2023
in क्राईम
0
तोरणमाळ आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा मृत्यूने खळबळ, मुख्याध्यापकसह कर्मचाऱ्यांवर चौकशी करून कारवाईची मागणी

म्हसावद  l प्रतिनिधी

धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथील शासकीय आश्रम शाळेत पहिलीत शिक्षण घेणाऱ्या डेबा दिला तडवी (वय ७ ) या विद्यार्थ्याचा आश्रम शाळेत अचानक मृत्यू झाल्याने शाळेत खळबळ उडाली आहे.नातेवाईकांनी आश्रम शाळेचा मुख्याध्यापकसह कर्मचाऱ्यांवर विरोधात आक्रोश केला आहे.

आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत तोरणमाळ येथे शासकीय आश्रम शाळा आहे येथे शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.येथे शिकणाऱ्या शहादा तालुक्यातील साबलापाणी येथील आमदारपाडा येथील डेबा दिला तडवी (वय ६) विद्यार्थाला दोन दिवसापासून पोट फुगत असल्याचा त्रास जाणवत होता . मंगळवारी दुपारी चार वाजेपर्यंत डेबा तडवी हा विद्यार्थी झोपेतून उठत नसल्याने येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

परंतु स्थानिक आश्रम शाळेतील शिक्षकांचा दुर्लक्षामुळे विद्यार्थ्याचा आश्रम शाळेत झोपतच मृत्यु झाल्याचे निष्पन्न झाल्याने नातेवाईकांनी आश्रम शाळेतील मुख्याध्यापकसह कर्मचाऱ्यांवर चौकशी करून कारवाईचा पवित्रा घेतला होता. घटना होऊन एक दिवस उलटून देखील जबाबदार अधिकाऱ्यांनी भेट न दिल्याने नातेवाईकांनी आक्रोश केला होता. सुमारे २१ तास उलटल्यावर सहायक प्रकल्प अधिकारी के. सी कोकणी यांनी तोरणमाळ घटना स्थळी भेट देत संबधित मुख्याध्यापक कर्मचारी यांची पारदर्शक चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.

तसेच शासनमार्फत मयत विद्यार्थाचा पालकाला दोन लाख रुपयांचे अनुदानाची तरतूद करून तात्काळ देण्यात येईल या नंतर सुमारे २१ तासानंतर शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला

पोलिसांचा बंदोबस्त:-

घटनास्थळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी म्हसावद पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजन मोरे यांनी आपल्या कर्मचाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मनलेश जायसवाल , नागझिरीचे येथील उपसरपंच रामदास पावरा, नाथा भील ,भरत पावरा ,छगन भिल ,मोहन वळवी, गुलाबसिंग भिल, तेरसिंग पावरा, बाऱ्या पाडवी, जगन मोरे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

फ़सव्या संदेशापासून सावध राहण्याचे आवाहन

Next Post

जगतज्योती महात्मा बसवेश्वर महामंडळाची स्थापना ;लिंगायत समाजात समाधान

Next Post
जगतज्योती महात्मा बसवेश्वर महामंडळाची स्थापना ;लिंगायत समाजात समाधान

जगतज्योती महात्मा बसवेश्वर महामंडळाची स्थापना ;लिंगायत समाजात समाधान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add