Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

फ़सव्या संदेशापासून सावध राहण्याचे आवाहन

team by team
August 10, 2023
in क्राईम
0
फ़सव्या संदेशापासून सावध राहण्याचे आवाहन

नंदूरबार l प्रतिनिधी

महावितरणच्या जळगांव परिमंडलात जळगांवसह धुळे आणि नंदुरबार या ग्रामीण जिल्ह्यांचा समावेश होतो. ग्रामीण भागातील लोक सोशल मिडीयावरील फ़सव्या संदेशांना लवकर आणि सहज बळी पडतात असे गृहित धरुन अलीकडे काही ठग सोशल मिडिया वरुन खोटे मेसेज पाठवून वीज ग्राहकांच्या फ़सवणूकीचे प्रयत्न करीत असल्याचे निदर्शानास येत आहे. वीज ग्राहकांनी तशा फ़सव्या मेसेजेसना बळी न पडता सावध राहण्याचे आवाहन मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी केले आहे.

            वीज ग्राहकांना फ़ोन वरुन  मेसेजेस, इतर सोशल मिडियावरुन संदेश पाठवून, वीज पुरवठा खंडित करण्याचा तपशील कळवून, ग्राहकांचा बॅंकीग डेटा जमा करुन फ़सवणूक केली जाते. त्याची दखल घेत महावितरणकडून वेळोवेळी वीज ग्राहकांना सतर्कही केले जाते.

        मागील महिन्याचे वीजबिल अपडेट करण्याचे सांगून किंवा तसे न केल्यास वीज पुरवठा खंडित करण्याचे फ़्रॉडर्सकडून सांगीतले जाते. वीज पुरवठा खंडित न करण्यासाठी मॅसेजमध्ये दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचेही कळविले जाते. तसेच त्याव्दारे वीजबिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरुन ऑनलाईन पेमेंटसाठी बनावट लिंक पाठवून वीज ग्राहकांना सॉफ़्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. त्यास प्रतिसाद दिल्यास मोबाईल किंवा संगणक हॅक करुन ग्राहकांच्या बॅंक खात्यातील रक्कम फ़्रॉडर्स काडून घेतात. त्यातून ग्राहकांची फ़सवणूक होते. अशी फ़सवणूक न होण्यासाठी वीज ग्राहकांनी फ़सव्या संदेशापासून सावध राहण्याची आवश्यकता आहे.

       वस्तुतः महावितरणकडून अथवा कोणत्याही किंवा कुणाच्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरुन अशा प्रकारचे एसएमएस व व्हॉटसअॅप मेसेज तसेच ई–मेल पाठविण्यात येत नाहीत. शिवाय, महावितरणकडून वीज बिलासाठी रात्रीच्या वेळेस कधीच वीज पुरवठा खंडित केला जात नाही. हे ग्राहकांनी लक्षात घ्यावे. असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात येत आहे.

      फ़सव्या संदेशाबाबत किंवा शंकास्पद संदेशाबाबत वीज ग्राहकांच्या तक्रारी असतील तर 24 तास सुरु असलेल्या 1800212 3435, 1800233 3435 आणि 1912 या टोल फ़्री क्रमांकावर किंवा जवळच्या महावितरण कर्यालयाशी संपर्क साधावा. याशिवाय cybercrime.gov.in वरही तक्रार नोंदविता येईल असे महावितरणतर्फ़े कळविण्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शेजवा येथील माध्यमिक विद्यालयातजागतिक आदिवासी दिवस व क्रांती दिवस साजरा 

Next Post

तोरणमाळ आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा मृत्यूने खळबळ, मुख्याध्यापकसह कर्मचाऱ्यांवर चौकशी करून कारवाईची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add