अक्कलकुवा l प्रतिनिधी
तालुक्यातील गृप ग्रामपंचायत पोरांबी येथे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचे भुमी पुजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
नंदुरबार जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती शंकर पाडवी यांच्या हस्ते पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले, तालुका संघटक आनंद वसावे, तालुकाप्रमुख मगन वसावे, तालुका उप प्रमुख तापसिंग पाडवी,
पोरांबीच्या सरपंच संगीताबाई नरेश वळवी, उप सरपंच योगेशकुमार वसावे, पेचरीदेवचे सरपंच वसंत वसावे, टावलीच्या सरपंच बबीता पाडवी, माजी सरपंच राजेंद्र वसावे, युवा सेनेचे तालुका प्रमुख निलेश वसावे, ग्रामपंचायत सदस्य तसेच शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.








