नंदूरबार l प्रतिनिधी
अर्हत प्रतिष्ठान नंदुरबार वतीने खा. डॉ. हीना गावीत यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार चषक क्रीडा महोत्सव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
या महोत्सवात बुद्धिबळ, फुटबॉल, क्रिकेट, कराटे,जम्प रोप, रोलबॉल स्केटिंग, आदी स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. या क्रीडा सप्ताहात नंदुरबार जिल्हा तथा दोंडाईचा, धुळे ,शिरपूर या तालुक्यातील एकूण१२०० (विद्यार्थी, विद्यार्थिनी) खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
खासदार चषक क्रीडा महोत्सव सप्ताहाचे पारितोषिक वितरण नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खा.डॉ. हीना गावित यांच्या हस्ते मोठ्या जल्लोषात शहरातील लाडकाणा मंगल कार्यालय येथे संपन्न झाला.
यावेळी आरपीआय आठवले पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील, भाजपा तालुका अध्यक्ष जितेन्द्र पाटील ,उद्योगपती मोहन खानवाणी, चावरा हायस्कूलचे क्रीडा प्रशिक्षक डॉ. दिनेश बैसाणे आदी मान्यवर उपस्थित होते. विविध गटातील खेळाडूंना ट्रॉफी, मेडल्स व सर्टिफिकेट देऊन खा.डॉ. हीना गावीत यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी खा. डॉ.हीना गावीत यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करतांना विजेत्यांचे अभिनंदन केले व जे जिंकू शकले नाहीत त्यांना शुभेच्छा दिल्या, आणि ज्यांना जिंकता आले नाही म्हणजे ते हरले असे समजू नये प्रयत्नांनी सर्व शक्य आहे. म्हणून तुम्ही पुढच्या वेळेस अजून प्रयत्न करा नक्की जिंकाल असे सांगून खेळाडूंचे आत्मबल वाढविले. यावेळी विद्यार्थी खेळाडूंसह त्यांचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अर्हत प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील यांनी केले.
सूत्रसंचालन गणेश पाटील यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हर्षबोध बैसाणे, संदीप खलाणे,विजय जगताप, खुशाल शर्मा, प्रवीण माळी, किरण मिस्तरी, योगेश कुंभार,दीपक बंडीवार, किरण खोकले, सिद्धार्थ साळुंके, गौतम पानपाटील,सौरभ साळुंके, शुभम कासार, अजय बागले, उमेश बंजारा, संभाजी सोनवणे,सचिन पिंपळे, नंदू पाटील, अंकूश कुकरेजा, आयुश गोगिया, श्रेयांश अग्रवाल, मोहीत नानकाणी,रवीन्द्र शिंदे,रामा हटकर,आशिष कडोसे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पाटील यांनी केले आभार प्रदर्शन सिध्दार्थ साळुंके यांनी केले.








