Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सावधान : नंदुरबार जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, नागरिकांना सुरक्षितता बाळगण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Mahesh Patil by Mahesh Patil
September 27, 2021
in आरोग्य
0
नंदुरबार l प्रतिनिधी
मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार 27 व 28 सप्टेंबर 2021 रोजी नंदुरबार जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर खांदे यांनी केले आहे.
नागरिकांनी वादळ, मेघ गर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना बाहेर जाणे टाळावे. मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जावून गुडघ्यात डोके घालून बसावे. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा. घराची बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नये. घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्वरित बंद करावीत.
या गोष्टी करु नका : आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाइन दूरध्वनीचा वापर करु नये. शॉवरखाली आंघोळ करु नये. घरातील बेसिनचे नळ, जलवाहिनीला स्पर्श करु नये. कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करु नये. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे सुरू असताना लोखंडी धातूच्या साहाय्याने उभारलेल्या तंबू, शेड,उंच झाडाच्या खाली आसरा घेवू नये.  धातूच्या उंच मनोऱ्याजवळ उभे राहू नये. घरात असाल, तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.
पूर परिस्थितीत काय करावे आणि काय करु नये
पूर येण्यापूर्वी : नागरिकांनी व्हॉटस्ॲप किंवा इतर समाज माध्यमांवर कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये व  अफवांवर विश्वास ठेवू नये. आपत्कालीन परिस्थितीसाठी एस.एम.एस चा उपयोग करावा. आपला मोबाईल चार्ज करुन ठेवावा. हवामानातील बदलांची अद्ययावत माहितीसाठी रेडिओ, टी.व्हीवर पाहत राहावी. गुरेढोरे, पशुंच्या सुरक्षितेची सोय सुनिश्चित करुन घ्यावी. आवश्यक वस्तूसह आपत्कालीन कीट तयार ठेवावी. आपली कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तू जलरोधक बॅग मध्ये ठेवावे. जवळपास असलेली निवारा, पक्के घराकडे जाण्यासाठी सुरक्षित मार्ग जाणून घ्यावा. सुरक्षित ठिकाणी  स्थलांतरीत होण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांच्या निर्देशनाचे पालन करावे. कमीत कमी एका आठवड्यासाठी पुरेसे खाण्याजोगे अन्न आणि पिण्यासाठी पाणी साठवा, पूर असलेल्या क्षेत्रातील कालवे, नाले, ड्रेनेज वाहिन्यापासून नागरिकांनी सतर्क राहावे.
पूर दरम्यान : पूर प्रवाहात प्रवेश करू नये. सिवरेज लाईन, गटारे, नाले, पूल,नदी, ओढे इत्यादी पासून दूर रहावे. विद्युत खांब आणि पडलेल्या वीज लाईन पासून दूर रहावे ओपन ड्रेन किंवा धोक्याच्या ठिकाणी चिन्हे (लाल झेंडे किंवा बॅरीकेड्स) सह चिन्हांकित करा. पुराच्या पाण्यामध्ये चालू नका किंवा गाडी चालवू नका. लक्षात ठेवा, दोन फुट वाहणारे पुराचे पाणी मोठ्या मोटारींना सुद्धा वाहून नेऊ शकते. ताजे शिजलेले किंवा कोरडे अन्न खावे. आपले अन्न झाकून ठेवा. उकळलेले,क्लोरीन युक्त पाणी प्यावे. आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी जंतुनाशकाचा वापर करावा.
पूर येऊन गेल्यानंतर : मुलांना पुराच्या पाण्यामध्ये किंवा जवळपास खेळू देऊ नका. कोणतीही खराब झालेली विद्युत वस्तू वापरू नका, त्यापूर्वी तपासणी करा. सूचना दिल्या असल्यास, मुख्य स्विचेस आणि विद्युत उपकरण बंद करा तसेच ओले असल्यास विद्युत उपकरणांना स्पर्श करू नका. तुटलेली विद्युत खांब आणि तारे, तीक्ष्ण वस्तू आणि मोडतोड अथवा पडझड झालेल्या वस्तूंपासून सावध रहा. पुरातील पाण्यात वाहून आलेले अन्न खाऊ नका. मलेरिया पासून बचाव करण्यासाठी डासांच्या जाळीचा वापर करा. सापांबद्दल सावधगिरी बाळगा कारण पुरामध्ये सर्पदंश होण्याची शक्यता असते. जर गटार लाईन फुटली असेल तर शौच्यालयाच्या किंवा पिण्याच्या पाण्याचा नळ वापरू नका. आरोग्य विभागाने सांगितल्याशिवाय नळाचे पाणी पिऊ नका.
पूर आल्यावर सुरक्षित ठिकाणी जाण्याची वेळ आल्यास : घरातील वस्तू  पलंगावर आणि टेबलावर ठेवा. शौच्यालयाच्या वाडग्यात वाळूच्या बॅग्स ठेवा आणि सांडपाणी परत येऊ शकते (बॅक फ्लो). ते टाळण्यासाठी सर्व ड्रेन होल झाकून ठेवा. वीज आणि गॅस कनेक्शन बंद करा. उंच मैदान,सुरक्षित ठिकाणी जा. आपत्कालीन कीट, प्रथमोपचार बॉक्स, मौल्यवान वस्तू आणि महत्त्वाची कागदपत्रे आपल्या बरोबर घ्या. खोल, पाण्यात प्रवेश करू नका, पाण्याची खोली तपासण्यासाठी काठी वापरा. जेंव्हा सक्षम अधिकारी आपल्या घराची तपासणी करून ते राहण्यास योग्य असल्याबाबत सांगतील व घरी परत जाण्याची परवानगी देतील तेंव्हाच घरात प्रवेश करा. कौटुंबिक संप्रेषण योजना बनवा. ओली झालेली प्रत्येक गोष्ट स्वच्छ आणि निर्जंतुक करा, प्रशासनाच्या सूचनाचे पालन करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

अक्कलकुवा तालुक्यातील वीज चोरी केल्याप्रकरणी दोघा दुकानदारांविरूद्ध गुन्हा

Next Post

दहावी व बारावीसाठी 17 नंबर फॉर्म ऑनलाईन भरण्यासाठी 12 ऑक्टोंबर 2021 पर्यंत मुदत

Next Post

दहावी व बारावीसाठी 17 नंबर फॉर्म ऑनलाईन भरण्यासाठी 12 ऑक्टोंबर 2021 पर्यंत मुदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पावसाळी आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे : डॉ. मित्ताली सेठी

पावसाळी आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे : डॉ. मित्ताली सेठी

May 9, 2025
अवकाळी’मुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून भरपाईची प्रक्रिया करा; डॉ. विजयकुमार गावित यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

अवकाळी’मुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून भरपाईची प्रक्रिया करा; डॉ. विजयकुमार गावित यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

May 9, 2025
बारा बलुतेदार समाजाने शिवसेनेशी जुळवून विकास साध्य करावा : प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे

बारा बलुतेदार समाजाने शिवसेनेशी जुळवून विकास साध्य करावा : प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे

May 9, 2025
नंदुरबार शहरातून अवैध मद्यासह साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार शहरातून अवैध मद्यासह साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त

May 6, 2025
भालेर ग्रुप ग्रामपंचायत सरपंच पदी कविता चंद्रशेखर पाटील यांची बिनविरोध निवड

भालेर ग्रुप ग्रामपंचायत सरपंच पदी कविता चंद्रशेखर पाटील यांची बिनविरोध निवड

May 6, 2025
श्रीमती क.पू. पाटील माध्यमिक विद्यालयात नंदनी पाटील प्रथम

श्रीमती क.पू. पाटील माध्यमिक विद्यालयात नंदनी पाटील प्रथम

May 6, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group