नंदूरबार l प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या शिफारशीनुसार युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवक काँग्रेस नंदुरबार जिल्हाध्यक्ष पदी नितीन रोहीदास जगताप यांची निवड झाल्याबद्दल आज नंदुरबार येथे त्यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार जिल्हा नेते उदेसिंग पाडवी यांच्या प्रमूख उपस्थितीत पार पडला.

याप्रसंगी शहादा तालुक्यांतील राष्ट्रवादी काँग्रेसचे एन.डी.पाटिल (माजी प्रदेश सरचिटणीस ओबीसी सेल ) , चंद्रकांत पाटील ( माजी नगरसेवक तथा माजी जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल) ,ॲड. दानिश पठाण ( माजी नगरसेवक तथा माजी जिल्हाध्यक्ष अल्संख्यांक विभाग) ,
इकबाल शेख ( माजी नगसेवक तथा माजी शहादा शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस ) , शुभम कुवर ( माजी शहादा शहर कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस ),राजरत्न बिरारे ( कार्यकर्ता ) , भालचंद्र निकम ( माजी जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी सेल) ,अरविंद पाटील ( माजी जिल्हा चिटणीस ओबीसी सेल ) ,वसीम खाटीक ( कार्यकर्ता ) आदी उपस्थित होते.









