Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तीन लाख रुपयाच्या विदेशी दारू जप्त, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याची कामगिरी

team by team
July 1, 2023
in क्राईम
0
तीन लाख रुपयाच्या विदेशी दारू जप्त, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याची कामगिरी

नंदूरबार l प्रतिनिधी

नंदूरबार उमर्दे रस्त्यावरील उड्डाणपुला खाली नंदूरबार शहर पोलिसांनी तीन लाख रुपयाच्या विदेशी दारूसह सात लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

गुजरात राज्यात दारूबंदी असल्याने महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात असलेल्या नंदुरबार जिल्हयातुन मध्यप्रदेश, हरियाणा व गोवा राज्यातील दारूची गुजरात राज्यात तस्करी होत असल्याच्या तक्रारी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना प्राप्त झाल्या होत्या. पोलीस अधीक्षक यांना प्राप्त झालेल्या तक्रारी वरुन त्यांनी नंदुरबार जिल्हयातील सर्व प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखा यांना अवैध दारूची तस्करी करणा-या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

 

दि. 30 जुन रोजी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना एक पांढ-या रंगाची महिंद्रा कंपनीची बोलेरो चारचाकी वाहन उमर्दे गावाकडून नंदुरबार शहराकडे अवैध दारू घेवून येणार आहे अशी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली. त्यावरुन त्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना सदर वाहनाची माहिती देवून तसेच बातमीची खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले.

 

 

नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर हे स्वतः तसेच त्यांचे सोबत पोलीस उप निरीक्षक विकास गुंजाळ, पोकॉ अनिल बडे, पोकॉ युवराज राठोड व इतर अंमलदार अशांना घेवून दारूची तस्करी करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यासाठी रवाना झाले.

 

 

नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने नंदुरबार शहरातील जगतापवाडी उड्डानपुलाच्या खाली उमर्दे रस्त्यावर सापळा लावला. तसेच गोपनीय बातमीदार यांचे संपर्कात राहून सदरची बोलेरो वाहनाची येण्याची वाट पाहत राहिले गोपनीय बातमीदार याने दारूची वाहतुक करीत असलेली एक पांढ-या रंगाची महिंद्रा कंपनीची बोलेरो (क्र. एम.एच-18- ए.जे.0995) ही उड्डाणपुलाच्या खाली आल्यावर तिला नंदुरबार शहर पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी थांबविण्याचा इशारा देवून थांबविण्याचा प्रयत्न केला.

 

 

परंतु वाहन चालकास संशय आल्याने त्याने पोलीसांपासून काही अंतरावर वाहन उभे करून वाहन सोडून पळ काढला त्याचा पोलीस पथकाने शिताफीने पाठलाग शेख अदील शेख रऊफ रा. गाझी नगर नंदुरबार यास अटक केली.पोलीस पथकातील अधिकारी अंमलदार यांनी संशयित वाहनाची दोन पंचासमक्ष पाहणी केली असता त्यात बेकायदेशीर वाहतुक करीत असलेली दारू मिळून आली.सदर दारूची पोलीसांनी पंचासमक्ष मोजणी केली असता,

 

त्यात 3 लाख 25 हजाराची बोलेरो, 1 लाख 15 हजार रुपये किंतीची विदेशी दारूच्या इम्पेरीयल ब्लू कंपनीच्या 180 ML च्या 720 बाटल्या प्रत्येकी किंमत 160 रुपये प्रमाणे, 1लाख 8 हजार रूपये किंमतीच्या विदेशी दारूच्या मॅकडॉवल नं. 1 कंपनीच्या 180 ML च्या 720 बाटल्या प्रत्येकी किंमत 150/- रुपये प्रमाणे, 57 हजार 600 रुपये किंमतीच्या विदेशी दारूच्या ऑफिसर चॉईस ब्लु कंपनीच्या 180 ML च्या 384 बाटल्या प्रत्येकी किंमत 150/- रुपये प्रमाणे, 9 हजार 300 रुपये किंमतीच्या विदेशी दारूच्या इम्पेरीयल ब्लू कंपनीच्या 2 L च्या 6 बाटल्या प्रत्येकी किंमत 1 हजार 550 रुपये प्रमाणे, 7 हजार 680 रुपये किंतीच्या विदेशी दारूच्या इम्पेरीयल ब्लू कंपनीच्या 750 ML च्या 12 बाटल्या प्रत्येकी किंमत 640 रुपये प्रमाणे,50 हजार रुपये रोख रक्कम त्यात 500 रूपये दराच्या 88 नोटा, 50रुपये दराच्या 100 नोटा, 20 रूपये दराच्या 22 नोटा, 10 रूपये दराच्या 56 चलनी नोटा बोलेरो वाहनात मिळून आल्या. एकुण 6 लाख 72 हजार 780रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांना आढळून आला.

 

 

सदर मुद्देमाल, बोलेरो वाहन व रोख रक्कम ही पोलीसांनी कायदेशीर प्रक्रीया करून ताब्यात घेतली. सदरची दारू कोणाची आहे ? याबाबत आरोपीत यास विचारणा केली असता ती अरूण चौधरी रा. नंदुरबार यांची असल्याची सांगितले.याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात शेख अदील शेख रऊफ रा. गाझी नगर नंदुरबार, तसेच संशयित आरोपी अरूण चौधरी रा. नंदुरबार यांच्याविरुध्द गु. रजि.नं. 575/2023, महाराष्ट्र दारुबंदी कायदा अधिनियम कलम 65 (अ) (ई) प्रमाणे नोंद करण्यात आला आहे.

 

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक, निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उप निरीक्षक विकास गुंजाळ, पोकॉ अनिल बड़े, पोकों युवराज राठोड, भटु धनगर व इतर अंमलदार यांच्या पथकाने केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

धडगाव तालुक्यातील नवनिर्मित 47 ग्रामपंचायतींना निधी खर्च करण्यासाठी एलजीडी कोड मिळण्याची मागणी

Next Post

प्रा. प्रकाश पाठक विशेष प्रविण्याने सेट उत्तीर्ण

Next Post
प्रा. प्रकाश पाठक विशेष प्रविण्याने सेट उत्तीर्ण

प्रा. प्रकाश पाठक विशेष प्रविण्याने सेट उत्तीर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add