Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगाव तालुक्यातील नवनिर्मित 47 ग्रामपंचायतींना निधी खर्च करण्यासाठी एलजीडी कोड मिळण्याची मागणी

team by team
June 30, 2023
in राजकीय
0
धडगाव तालुक्यातील नवनिर्मित 47 ग्रामपंचायतींना निधी खर्च करण्यासाठी एलजीडी कोड मिळण्याची मागणी

नंदुरबार l प्रतिनिधी

धडगाव (अक्राणी) तालुक्यातील नवनिर्मित झालेल्या 47 ग्रामपंचायतींना एल.जी.डी. कोड न मिळाल्याने 15 वित्त आयोगाचा निधी विकास कामांसाठी खर्च करण्यास अडचणी येत असून विकास कामेही रखडली आहेत.

 

म्हणुन धडगाव तालुक्यातील तोरणमाळ भागातील नवनिर्मित 47 ग्रामपंचायतींना 15 वा वित्त आयोग अंतर्गत विकास कामांसाठी मंजूर झालेला व मिळालेला निधी खर्च करण्यासाठी ग्रामपंचायतींना आवश्यक असलेला एल.जी.डी.कोड (क्रमांक) देण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेत शिक्षण सभापती गणेश पराडके, खडकीचे सरपंच सिताराम नुरला पावरा, झापीच्या सरपंचा गिता भारसिंग पावरा, सिंधीदिगरच्या सरपंचा सोमाबाई संदिप पावरा यांनी केली आहे.

 

 

याबाबत नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य शासनाने मागील वर्षी नोव्हेंबर- डिसेंबर 2022 मध्ये धडगांव (अक्राणी) तालुक्यातील तोरणमाळ भाग, मांडवी भाग, भुषा भाग, रोषमाळ भाग या भागातील तीन ग्रामपंचायतींचे विभाजन करुन नव्याने 47 ग्रामपंचायतींची निर्मिती करण्यात आली. या 47 ग्रामपंचायतींची निर्मिती होवून तब्बल सात महिन्याहून अधिक कालावधी झाला आहे.

 

 

या नवनिर्मित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकाही पार पडून सात महिने झाले. सदर ग्रामपंचायतींच्या हद्दीतील विकास कामांसाठी प्रस्ताव व आराखडा सादर करण्यात आल्याने राज्य शासन व नंदुरबार जिल्हा परिषद आणि धडगांव पंचायत समितीच्या माध्यमातून 15 वा वित्त आयोगाचा निधी नवनिर्मित 47 ग्रामपंचायतींना मंजूर होवून मिळाला आहे. परंतू हा निधी विकास कामांसाठी खर्च करण्यासाठी ग्रामपंचायतींकरीता आवश्यक असलेला एल.जी.डी. कोड (क्रमांक) अद्यापपर्यंत नवीन ग्रामपंचायतींना मिळालेला नाही.

 

यात तोरणमाळ भागातील खडकी, झापी, फलाई, सिंधीदिगर, कुंड्या, भादल, केलापाणी, भाबरी, उडद्या, भमाणे, सावर्‍यादिगर, बिलगाव, त्रिशूल, चिखलीबरी, माळ, शेलगदा, गेंदा अशा एकूण 47 नवीन ग्रामपंचायतींना महाराष्ट्र राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून एल.जी.डी. कोड (क्रमांक) मिळालेला नसल्याने सदर ग्रामपंचायतींतर्गत येणारी गावे विकास कामांपासून वंचित आहेत. तसेच विकास कामांसाठी मिळालेला निधी मंजूर होवून ग्रामपंचायतींच्या बँक खात्यात पडून असल्याने त्याचा काहीही उपयोग होत नाही. आठ महिन्यांपूर्वी निवडणूकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच, उपसरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांना विकास कामे होत नसल्याबाबत नागरीकांकडून विचार होत असल्याने उत्तरे द्यावी लागत आहेत.

 

 

म्हणून धडगाव तालुक्यातील तोरणमाळ भागातील नवनिर्मित 47 ग्रामपंचायतींना 15 वा वित्त आयोग अंतर्गत विकास कामांसाठी मंजूर झालेला व मिळालेला निधी खर्च करण्यासाठी ग्रामपंचायतींना आवश्यक असलेला एल.जी.डी.कोड (क्रमांक) त्वरीत देण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेत शिक्षण सभापती गणेश पराडके, खडकी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच सिताराम नुरला पावरा, झापी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंचा गिता भारसिंग पावरा, सिंधीदिगर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचा सोमाबाई संदिप पावरा यांनी निवेदनातून केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

तीन ते चार महिन्यांत जिल्ह्यातील निवडणुका लागणार, जिल्हा वार्षिंक योजनेचा निधी यंत्रणांनी विहित कालमर्यादेत खर्च करावा; पालकमंत्री विजयकुमार गावित

Next Post

तीन लाख रुपयाच्या विदेशी दारू जप्त, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याची कामगिरी

Next Post
तीन लाख रुपयाच्या विदेशी दारू जप्त, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याची कामगिरी

तीन लाख रुपयाच्या विदेशी दारू जप्त, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याची कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add