Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

team by team
August 13, 2026
in Uncategorized
0
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

नंदुरबार l प्रतिनिधी-

कान्हादेशात मोठ्या उत्साहात श्री. कानुबाई मातेचा उत्सव श्रावण महिन्यात साजरा केला जातो. यावर्षी नंदुरबार शहरात दिनांक १६ ऑगस्ट २०२६ रविवार रोजी श्री कानुबाई मातेची स्थापना होणार असून दिनांक १७ ऑगस्ट २०२६ सोमवार रोजी विसर्जन होणार आहे. नंदुरबार शहरातील बहुतांश भाविक भक्त श्री कानुबाई मातेचे विसर्जन श्री गजानन महाराज मंदिर शेजारील पुलाजवळील नदीपात्रात करत असतात. यावर्षी दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे नदीपात्रात पाणी नसल्यामुळे भाविक भक्तांना कानुबाई मातेचे विसर्जन करण्यासाठी पाण्याची व्यवस्था तसेच नदीपात्राची स्वच्छता करावी या आशयाचे निवेदनातून पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्याकडे हिंदु सेवा सहाय्य समितीने केली. यावर मुख्याधिकारी यांनी तात्काळ संबंधीत विभागाचे अधिकारी यांना कार्यवाहीची सूचना दिल्या.

 

निवेदनात मागण्या करण्यात आल्या की, श्री कानुबाई माता विसर्जनासाठी गजानन महाराज मंदिर नदीपात्रातजवळ पाण्याचे टँकरने पाण्याची व्यवस्था करावी, गजानन महाराज मंदिर शेजारील नदीपात्रात जाण्यासाठी मार्गावर मोठ्या प्रमाणात गवत, केरकचरा आहे, ते JCB चा सहाय्याने १४ ऑगस्टपर्यंत स्वच्छता करून त्याठिकाणी श्री कानुबाई मातेचा विसर्जन करण्यास जागा स्वछ करून द्यावी, कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी ‘निर्माल्य’ गोळा करण्यासाठी स्वच्छ गाडीची व्यवस्था करावी व ते निर्माल्य विधिवत विसर्जन करावे, मांस विक्री करणारे त्यांच्याकडील मांसाची घाण नदीपात्रात टाकत असतात त्यामुळे पाणी प्रदूषित होते तरी अश्या घाण टाकणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, नदीपात्रात घाण, कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाईचा फलक त्याठिकाणी लावावा असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर हिंदु सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील, जितेंद्र राजपूत, पंकज डाबी, उज्वल राजपूत, पंकज मुसळे, संदीप राजपूत, विनायक राजपूत आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

Next Post

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

Next Post
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add