Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

मोबाईलमध्ये ६९२ व्हिडिओ क्लिप, ११०० हून अधिक फोटो

team by team
August 13, 2026
in Uncategorized
0
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

नंदुरबार l प्रतिनिधी-

अल्पवयीन मुले व समवयस्क युवकांना पैशांचे आमिष दाखवून त्यांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपातील संशयित चेतन प्रकाश कोळी (वय २२, रा. रायसिंगपुरा, नंदुरबार) याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने आणखी सहा दिवसांची वाढ केली आहे. यापूर्वी त्याला १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता तपासासाठी आवश्यक बाबींचा हवाला देत अधिक कोठडीची मागणी करण्यात आली. त्यानुसार न्यायालयाने संशयिताला आता १८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

दरम्यान, तपासात संशयिताच्या ताब्यातील मोबाईलमध्ये तब्बल 692 व्हिडिओ क्लिप तसेच ११०० हून अधिक छायाचित्रे आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या डिजिटल सामग्रीची तपासणी करून त्यातील नेमका मजकूर, संबंधित व्यक्तींची ओळख आणि या सामग्रीचा वापर कोणत्या कारणासाठी करण्यात आला होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता डिजिटल पुरावे तपासणे आणि त्यातील माहितीच्या आधारे पुढील तपास करणे पोलिसांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

 

चेतन कोळी याला ६ ऑगस्ट रोजी नंदुरबार शहरालगतच्या भोणे फाटा परिसरातील पपईच्या शेतात एका अल्पवयीन मुलाला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले होते. त्यानंतर पंच व फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या उपस्थितीत त्याच्या मोबाईलची तपासणी करण्यात आली होती. तपासादरम्यान मोबाईलमध्ये आक्षेपार्ह डिजिटल सामग्री आढळल्याचा पोलिसांचा दावा आहे.

 

या प्रकरणात अल्पवयीन मुले व युवकांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याशी संपर्क साधणे, जवळीक निर्माण करणे आणि त्यानंतर त्यांचे शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील डिजिटल पुराव्यांची सखोल तपासणी सुरू असून मोबाईलमधील संपर्क, व्हिडिओ क्लिप आणि छायाचित्रांच्या आधारे संभाव्य पीडितांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक तपासात या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

न्यायालयीन कोठडी वाढल्याने पोलिसांना डिजिटल पुरावे, संपर्कातील व्यक्ती आणि प्रकरणाशी संबंधित अन्य बाबींचा अधिक सखोल तपास करण्यासाठी वेळ मिळणार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

Next Post

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

Next Post
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add