नंदुरबार l प्रतिनिधी-
शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे “वाचनातून ज्ञान, ज्ञानातून प्रगती!” चा संदेश देत राष्ट्रीय ग्रंथालय दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
सुरवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज एम. चौधरी यांच्या हस्ते डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पूष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर प्राचार्य डॉ. पंकज चौधरी यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, ज्ञानाचा विस्तार व्हावा आणि शैक्षणिक विकासाला चालना मिळावी या उद्देशाने महाविद्यालयाच्या ग्रंथालयासाठी ज्ञानवर्धक व उपयुक्त पुस्तके भेट दिली. त्यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना विविध विषयांचे अधिक ज्ञान मिळण्यास तसेच वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळण्यास निश्चितच मदत होणार आहे.
कार्यक्रमादरम्यान ग्रंथालयाचे महत्त्व, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत ग्रंथालयाची भूमिका आणि नियमित वाचनाचे फायदे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रम आनंददायी व प्रेरणादायी वातावरणात उत्साहात पार पडला.
कार्यक्रमास प्राचार्य डाॅ.पंकज चौधरी, रजिस्ट्रार दगाभाई पाटील, शिक्षक डाॅ.भूपेंद्र पाटील, भूषण गोपाळ, वसंत चव्हाण, संपत पाडवी, कल्याणी जावरे, प्रज्ञा वळवी, दिनेश पवार, मोहम्मद पाशा, शुभम पाटील, जागृती शेवाळे, तश्विता मगरे, भावना वसावे, पूजा गायकवाड, प्रांजल पाटील, रोहीत सोनवणे, रोहिणी पाटील, पायल निकुंभे, रसना पाटील, अश्विनी सामुद्रे तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा योगिता पाटील व सचिव गणेश पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले. व राष्ट्रीय ग्रंथालय दिनानिमित्त महाविद्यालयातील सर्व शिक्षक, ग्रंथालय कर्मचारी व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. पूजा गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. प्रांजल पाटील यांनी मानले.










