म्हसावद l प्रतिनिधी
विद्या गौरव प्रायमरी व गौरव सेकंडरी इंग्लिश मेडीयम व गौरव कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून ललित पाठक तर अध्यक्षस्थानी विश्वास पवार हे होते.
या आधुनिक जगात बालपणापासूनच विविध सांस्कृतिक घटकांची ओळख व्हावी हा उद्देश लक्षात घेऊन आषाढी एकादशीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वारकरी संप्रदायाचे दैवत विठ्ठल व रखुमाईच्या मुर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या मुलांनी आकर्षक विविध सांस्कृतिक पोशाख परिधान करुन विठ्ठल व रखुमाईच्या पालखी हाती घेत मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीत नृत्याचाही आनंद घेतला व उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वास पवार व ललित पाठक यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षिका प्रीती बूनकर,गौरी सूर्यवंशी, मयुरी पवार,सारीका शिंदे,वैशाली पावरा,विजया भारती, नेहा कासार,आरती यादव,शिलाबाई माळी, राजश्री शिंपी,शिक्षक श्रावण सूर्यवंशी,क्रीडा शिक्षक पुलायन जाधव, संजय मोरे,किरण वळवी,किरण वसावे,निलेश ढोढरे,दशरथ वसावे,अमरसिंग वळवी यांनी मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका वर्षा केदार यांनी केले तर आभार शिक्षिका गौरी सूर्यवंशी यांनी मानले.यावेळी शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी व पालक उपस्थित होते.








