नंदूरबार l प्रतिनिधी
डॉ. हिना विजयकुमार गावित जी,
तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि शुभेच्छा.
मी तुमच्या जीवनात शांती आणि आनंदासाठी प्रार्थना करतो.
भूतकाळातील आठवणींना उजाळा देण्यासाठी वाढदिवस हा एक खास प्रसंग आहे. त्याच वेळी, हा दिवस आपल्याला आपल्या कुटुंब, समाज आणि राष्ट्राप्रती असलेले कर्तव्य नव्या उत्साहाने पार पाडण्याची प्रेरणा देतो. येणाऱ्या काळात तुम्ही लोकांच्या कल्याणासाठी नव्याने समर्पणाने झटत राहा.
तुम्हाला उत्तम आरोग्याने भरलेले दीर्घायुष्य लाभो. मी पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो.
हार्दिक शुभेच्छा,
तुमचा
नरेंद्र मोदी
हे शुभेच्छा पत्र आहे, जगातील सर्वात शक्तीशाली नेते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कारण ही तसेच आहे.नंदूरबार लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय,अभ्यासु संसदरत्न खा.डॉ. हिना गावित यांचा 28 जुन रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज.26 जुन रोजी पंतप्रधान यांनी खा.डॉ. हिना गावित यांना शुभेच्छा संदेश पाठविला आहे.
नंदूरबार लोकसभा मतदार संघात गेल्या 2 टर्म मध्ये खा.म्हणून डॉ. हिना गावित या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या.
खा.डॉ.गावित यांच्या कार्यकाळात नंदुरबार लोकसभा मतदार संघात सन २०१४ ते २०२२ या काळात कोटयावधी रुपयांची विकास कामे करण्यात आली असून अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. आगामी काळात जिल्हयात १० हजार ५ कोटी रुपयांचे २७७.८९ किमीचे राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रस्तावित आहेत. यात ५०० कोटी रुपये खर्चाच्या खेतिया-नंदुरबार-विसरवाडी-साक्री-पिंपळनेर राष्ट्रीय महामार्ग (५०.२० किमी), २१० कोटी रुपये खर्चाच्या खेतिया-शहाद-नंदुरबार-विसरवाडी-साक्री-पिंपळनेर (२१ किमी), १७५ कोटी रुपयंच्या राष्ट्रीय महामार्ग शेवाळी-निजामपूर-छडवेल-नंदुरबार-तळोदा-अक्कलकुवा ते गुजरात सिमाा, शेवाळी फाटा ते कळंभीर, निजामपूर महामार्ग (१६.६९ किमी), ९ हजार १२० कोटी रुपये खर्चाचा धुळे-वडोदरा, राष्ट्रीय महामार्ग क्र.३ वरील सोनगीर पासून ते वडफळी ता.अक्कलकुवा (सोनगीर-चिमठाणे-दोंडाईचा सारंगखेडा-शहादा-फत्तेपूर-दरा मोलगी-पिंपळखुटा-वडफळी व मध्यप्रदेशच्या सिमेपर्यंत (१९० किमी) या रस्त्यांचा समावेश आहे.
आगामी काळात नंदुरबार लोकसभा मतदार संघात नंदुरबार येथे क्रिटीकेअर हॉस्पीटलला मंजूरी, जिल्ह्यातील सर्व तालुक्यात सार्वजनिक आरोग्य शाळा उभारणे, जिल्ह्यात एक सैनिकी शाळा मंजूर करणे, जिल्ह्यात टेक्सटाईल पार्कसाठी प्रयत्न, मेडिकल इक्वीपमेंट डिवाईस पार्क सुरु करणे, नंदुरबार येथे केंद्रिय विद्यालय सुरु करणे, नंदुरबार येथे पासपोर्ट कार्यालय सुरु करणे, नंदुरबार येथे प्लास्टिक इंजिनीयरींग कॉलेज सुरु करणे आदी कामे प्रस्तावित आहेत, लवकरच त्यांना मंजूरी मिळणार आहे.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सन २०१४ पासून २०२२ पर्यंत यापुर्वी कधीही झालेेली नव्हती, एवढी कामे पूर्ण झाली आहेत. शहरी भागात २६ तर ग्रामीण भागात ४३ अशा एकूण ६९ मोबाईल टॉवर्सला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच नव्याने एकूण १४० टॉवर्सला मंजुरी मिळाली आहे. रेडीओ एफएम सुरु करण्यात आले आहे. अक्कलकुवा येथील पोस्ट ऑफिस कार्यालयात नव्याने रेल्वे तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नंदुरबार रेल्वेस्थानक इमारतीला हेरिटेज लूक देऊन सदर इमारतीच्या नूतनीकरणासाठी २ कोटी ३० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय महिला प्रतीक्षालय, बैठक हॉलचे बांधकाम, सीएमआय ऑफिस, पार्सल ऑफिस बांधकाम, वाढीव बोगद्याचे बांधकाम, दिव्यांगांसाठी नवीन शौचालयाचे बांधकाम करण्यात आले आहेत आदी २४ कोटी ७२ लाख ३४ हजार ६१३ रुपयांची कामे झाली आहेत.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील ३६ गावांना ४७९ कोटी ८६ लाख ९४ हजार ३९१ रुपये मंजूर करण्यात आले आहे. साक्री व शिरपूर तालुक्यातील पाच गावांना ४ हजार ८३९ कोटी ४१ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्ह्यात मतदार संघात ११६५ गावांमध्ये ९१८ कोटी ९४ लाख मंजूर करण्यात आले आहे. याशिवाय १७३३ सोलर योजनांसाठी २३९ कोटी ६१ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात ६ लाख ८२ हजार ७१७ जनधन खाते उघडण्यात आले आहेत. पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेअंतर्गत १ लाख ३७ हजार ८६३ खाते उघडण्यात आले आहेत. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत २ लाख ६७ हजार ९१७ खाते उघडण्यात आले आहेत. अटल पेन्शन योजनेअंतर्गत ३५ हजार १९८ खाते उघडण्यात आले आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी १ लाख २२ हजार २५ शेतकर्यांना वाटप करण्यात आला आहे. १ लाख ९ हजार ४६२ शेतकर्यांना किसान क्रेडिट कार्डचे वाटप करण्यात आले असून यासाठी ३२६ कोटी रक्कम मंजूर करण्यात आली आहे.
स्टार्ट अप इंडिया मधून ४० लोकांना ६९१ कोटी ९ लाखाच्या निधी कर्ज म्हणून देण्यात आला आहे. मुद्रा लोनमधून ३० हजार ९७५ लोकांना ११७ कोटी ४७ लाखाचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. पंतप्रधान स्वनिधी योजनेमधून २ हजार ७७२ जणांना १९२ कोटी ६४ लाखाचा निधी देण्यात आला आहे.
पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत जिल्ह्यातील नऊ रस्ते मंजूर करण्यात आले असून यासाठी ५४ कोटी ९४ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. धडगाव, अक्कलकुवा तालुक्यातील १४ रस्त्यांसाठी ११० कोटी १७ लाख ११ हजाराचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तळोदा तालुक्यातील सहा रस्त्यांसाठी १८ कोटी ३० लाख ६ हजार रुपयांच्या निधी मंजूर करण्यात आला आहे. नवापूर तालुक्यातील पाच रस्त्यांसाठी २१ कोटी ९४ लाख ७१ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नंदुरबार तालुक्यातील ६ रस्त्यांसाठी १९ कोटी ९२ लाख ७७ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शहादा तालुक्यातील नऊ रस्त्यांसाठी २८ कोटी ४ लाख ७३ हजार रुपयांच्या निधी, साक्री तालुक्यातील चार रस्त्यांसाठी २४ कोटी १९ लाख १४ हजार, शिरपूर तालुक्यातील चार रस्त्यांसाठी १९ कोटी १ लाख ९० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
नंदुरबार तालुक्यातील पाच रस्त्यांसाठी ८८ कोटी ३९ लाख, तळोदा तालुक्यातील दोन रस्त्यांसाठी २१ कोटी ४ लाख, नवापूर तालुक्यातील एका रस्त्यासाठी ४ कोटी ४६ लाख, शहादा तालुक्यातील तीन रस्त्यांसाठी १६ कोटी ८६ लाख राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत विसरवाडी कोळदे खेतिया खेतिया रस्त्यासाठी महामार्गासाठी ५०९ कोटी १८ लाख, साक्री-शिर्डी रस्त्यासाठी २७७ कोटी ४२ लाख, शेवाळी-नंदुरबार रस्त्यासाठी १२० कोटी, मालेगाव-शहादा रस्त्यासाठी ३१ कोटी २ लाख, फागणे-विसरवाडी रस्त्यासाठी ११०० कोटी अशा २०३८ कोटी २ लाख रुपयांच्या महामार्गांना निधी मंजूर झाला आहे.
इंदिरा आवास योजनेअंतर्गत सन २०१४ ते १६ या कालावधीत ४७ हजार ६४७ घरकुले मंजूर झाले असून यासाठी ४५२ कोटी ६४ लाख ६५ हजार, सन २०१६ ते २२ दरम्यान पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १ लाख ६४ हजार ५४७ घरकुल मंजूर झाले असून १९७४ कोटी ५६ लाख ४० हजार रुपयांच्या निधी मंजूर झाला आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सन २०१४ ते २२ दरम्यान १ लाख ८५ हजार ७३ शौचालय मंजूर झाले असून त्यावर २२२ कोटी ८ लाख ७६ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील १३५० दिव्यांगांना कृत्रिम पाय, श्रवण यंत्र, व्हीलचेअर यासह विविध वस्तूंसाठी १८ लाख ८८ हजार २५४ रुपये खर्च करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील १७ ठिकाणी विविध बँकांच्या १७ शाखा मंजूर करण्यात आल्या आहेत. श्रावणी येथील नवोदय विद्यालयासाठी १६ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यात २८ नवीन गॅस एजन्सी उज्वला योजनेकरता मंजुर करण्यात आल्या आहेत. स्थलांतर करणार्या ५६ हजार सर्वेक्षित कुटुंबांना एक देश एक रेशन कार्ड अंतर्गत लाभ देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील चार ठिकाणी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूलसाठी १२४ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच शासकीय महाविद्यालयाला १९५ कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या कामांच्या आधारावर खा.डॉ. हिना गावित यांची दिल्ली दरबारी विशेष नोंद घेण्यात येते.त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढदिवसासाठी शुभेच्छा पत्र पाठवले आहे.








