नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील ठाकरे गटातर्फे जिल्ह्यातील औषध विक्रेते जादा दरात औषधे विक्री करतात याच्या विरोधात जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात निवासी वैद्यक अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
जिल्ह्यातील दवाखान्यांमध्ये असलेल्या मेडिकल मध्ये जास्त किमतीचे औषधे विक्री होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात आल्या निमित्त शिवसेनेतर्फे निवेदन देण्यात आले या निवेदनात मेडिकलवर 15 ते 20 टक्के जागा आकार करून औषधे विकली जात असल्याची माहिती ठाकरे गटाच्या पद अधिकाऱ्यांना माहिती मिळाली तसेच दवाखान्या जवळील मेडिकल मध्ये औषध हे जास्त दरात मिळत असते व बाजारपेठेतील औषधे 15 ते 20 टक्के कमी दरात मिळत असतात यात दवाखान्याजवळील मेडिकल मधून औषधे ही जागा दरात विक्री होत असल्याची ह्यात निदर्शनात आले म्हणून ठाकरे गटातर्फे निवेदन देण्यात आले निवेदनावर शिवसेना महानगर प्रमुख पंडित माळी, तालुका प्रमुख विजय ठाकरे, छोटू चौधरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .








