Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्यातील सर्व आश्रमशाळांना वॉशिंग मशिन देणार -पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

team by team
June 19, 2023
in राजकीय
0
राज्यातील सर्व आश्रमशाळांना वॉशिंग मशिन देणार -पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

नंदुरबार l प्रतिनिधी

राज्यातील सर्व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना कपडे धुण्यासाठी वॉशिग मशिन देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

 

ते धडगांव तालुक्यातील त्रिशुल, काकरदा, मोजरा, तलई येथील शासकीय मुलींच्या वसतीगृह/आश्रमशाळांच्या नूतन इमारतीचे भुमीपूजन प्रसंगी बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग (आदिवासी विकास) शाखा अभियंता एम.जी.मोरे,कनिष्ठ अभियंता एम.डी.पाटील, सामाजिक कार्यकर्ते डॉ. कांतीलाल टाटिया यांच्यासह स्थांनिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

यावेळी डॉ.गावित म्हणाले की, राज्यातील आश्रमशाळेत प्रवेश घेणारे विद्यार्थी हे पहिल्या वर्गापासून प्रवेश घेतात शाळेत दाखल होतांना त्यांचे वय खुप कमी असल्याने अशा विद्यार्थ्यांना स्वत:चे गणवेश व कपडे धुवावे लागतात यासाठी राज्यातील सर्व आश्रमशाळेत येत्या काळात गणवेश व कपडे धुण्यासाठी वॉशिग मशीन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशास इस्त्री करण्यासाठी मनुष्यबळाची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येईल.

 

 

प्रत्येक पालकांना वाटते की आपली मुले चांगल्या शाळेत शिकायला पाहिजे, चांगला गणवेश परिधान केला पाहिजे. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण व सोईसुविधा उपलब्ध होण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणात नवीन आश्रमशाळाच्या बांधकामास सुरुवात केली. यावर्षी राज्यात 56 नवीन शाळांना बांधकामास मंजूरी देण्यात आली त्यात नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक 30 शाळांचा समावेश आहे. या नवीन इमारती अत्यंत चांगल्या बांधण्यात येत असून या इमारतीत ई-लायब्ररी, अत्याधुनिक लॅब, व्हर्चुअल क्लासरूम,अत्याधुनिक कॉम्पुटरची व्यवस्था , प्रयोगशाळांची सोय करण्यात येणार आहे. पुढील काळात इयत्ता आठवी पासून सर्व विद्यार्थ्यांना टॅब देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

 

ते पुढे बोलतांना म्हणाले की, राज्यातील सर्व आश्रमशाळेतील शिक्षकांच्या रिक्त पदे भरण्यास मंजूरी देण्यात आली असून लवकरच ती पदे भरली जाणार असून उच्च शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी संपूर्ण राज्यात 500 व 250 विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह बांधण्यात येत आहेत.

 

 

आदिवासी विकास विभागामार्फत दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात येत असून येत्या काळात आश्रमशाळा परिसरातच शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने देखील बांधण्यात येणार आहेत. प्रत्येक आश्रमशाळेचा निकाल हा 100 टक्के लागावा यासाठी राज्यातील सर्व आश्रमशाळेत एकाच पद्धतीने अभ्यासक्रम शिकविले जाणार असून सर्व विद्यार्थ्यांची दोन तीन महिन्यांनी परीक्षा तसेच शिक्षकांच्याही परीक्षा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

ज्या विषयांत मुलांचा निकाल समाधानकारक लागणार नाही, अशा विषयांच्या शिक्षकांची वेतनवाढ रोखण्यात येतील. तर सातत्याने चांगले निकाल लागणाऱ्या शिक्षकांना वाढीव वेतनवाढ किंवा बक्षीस देण्यात येईल. राज्यातील सर्व आश्रमशाळेतील गणवेश, बुट व इतर शैक्षणिक साहित्यात एकसमानता राखण्यासाठी गणवेश ,बुट, आणि शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी पुर्वीच्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जुलै महिन्यापासून खावटी कर्ज देणार असून दिवाळीपर्यंत अनुसूचित जमातीच्या नागरिकांना,रोजगारासाठी बकरी ,कोंबडी व बचत गटांना अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

तिच्या हाती बससे सूत्र : जिल्ह्यात प्रथमच शहादा आगारात महिला चालक रुजू

Next Post

नंदूरबार येथे पाच हजाराची लाच स्वीकारताना विस्तार अधिकाऱ्यास अटक

Next Post
नंदूरबार येथे पाच हजाराची लाच स्वीकारताना विस्तार अधिकाऱ्यास अटक

नंदूरबार येथे पाच हजाराची लाच स्वीकारताना विस्तार अधिकाऱ्यास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add