Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात नऊ वर्षात झाला कायापालट : खा.डॉ. हीना गावीत

team by team
June 12, 2023
in राजकीय
0
नंदुरबार लोकसभा मतदारसंघात नऊ वर्षात झाला कायापालट : खा.डॉ. हीना गावीत
नंदूरबार l प्रतिनिधी
देशात आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षाच्या काळात सर्वाधिक कामे झाली असून नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सन २०१४ पासून २०२२ पर्यंत यापुर्वी कधीही झालेेली नव्हती, एवढी कामे पूर्ण झाली आहेत.कोट्यवधींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे असे खा.डॉ. हीना गावीत म्हणाल्या.
नंदूरबार येथे मोदी@९ अभियाना अंतर्गत आतापर्यंत ९ वर्षात झालेल्या कामांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी खा.डॉ.गावित पुढे म्हणाल्या, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आतापर्यंत सर्वाधिक कामे झाले आहेत.
तर नंदुरबार लोकसभा मतदार संघात सन २०१४ ते २०२२ या काळात कोटयावधी रुपयांची विकास कामे करण्यात आली असून अनेक कामे प्रगतीपथावर आहेत.  पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत जिल्ह्यातील नऊ रस्ते मंजूर करण्यात आले असून यासाठी ५४ कोटी ९४ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. धडगाव, अक्कलकुवा तालुक्यातील १४ रस्त्यांसाठी ११० कोटी १७ लाख ११ हजाराचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तळोदा तालुक्यातील सहा रस्त्यांसाठी १८ कोटी ३० लाख ६ हजार रुपयांच्या निधी मंजूर करण्यात आला आहे. नवापूर तालुक्यातील पाच रस्त्यांसाठी २१ कोटी ९४ लाख ७१ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नंदुरबार तालुक्यातील ६ रस्त्यांसाठी १९ कोटी ९२ लाख ७७ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शहादा तालुक्यातील नऊ रस्त्यांसाठी २८ कोटी ४ लाख ७३ हजार रुपयांच्या निधी, साक्री तालुक्यातील चार रस्त्यांसाठी २४ कोटी १९ लाख १४ हजार, शिरपूर तालुक्यातील चार रस्त्यांसाठी १९ कोटी १ लाख ९० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
नंदुरबार तालुक्यातील पाच रस्त्यांसाठी ८८ कोटी ३९ लाख, तळोदा तालुक्यातील दोन रस्त्यांसाठी २१ कोटी ४ लाख, नवापूर तालुक्यातील एका रस्त्यासाठी ४ कोटी ४६ लाख, शहादा तालुक्यातील तीन रस्त्यांसाठी १६ कोटी ८६ लाख राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत विसरवाडी कोळदे खेतिया खेतिया रस्त्यासाठी महामार्गासाठी ५०९ कोटी १८ लाख, साक्री-शिर्डी रस्त्यासाठी २७७ कोटी ४२ लाख, शेवाळी-नंदुरबार रस्त्यासाठी १२० कोटी, मालेगाव-शहादा रस्त्यासाठी ३१ कोटी २ लाख, फागणे-विसरवाडी रस्त्यासाठी ११०० कोटी अशा २०३८ कोटी २ लाख रुपयांच्या महामार्गांना निधी मंजूर झाला आहे.
आगामी काळात जिल्हयात १० हजार ५ कोटी रुपयांचे २७७.८९ किमीचे राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रस्तावित आहेत. यात  ५०० कोटी रुपये खर्चाच्या खेतिया-नंदुरबार- विसरवाडी-साक्री-पिंपळनेर राष्ट्रीय महामार्ग (५०.२० किमी), २१० कोटी रुपये खर्चाच्या खेतिया-शहाद-नंदुरबार-विसरवाडी-साक्री-पिंपळनेर (२१ किमी), १७५ कोटी रुपयंच्या राष्ट्रीय महामार्ग शेवाळी-निजामपूर-छडवेल-नंदुरबार-तळोदा-अक्कलकुवा ते गुजरात सिमाा, शेवाळी फाटा ते कळंभीर, निजामपूर महामार्ग (१६.६९ किमी), ९ हजार १२० केटी रुपये खर्चाचा धुळे-वडोदरा, राष्ट्रीय महामार्ग क्र.३ वरील सोनगीर पासून ते वडफळी ता.अक्कलकुवा (सोनगीर-चिमठाणे-दोंडाईचा सारंगखेडा-शहादा-फत्तेपूर-दरा मोलगी-पिंपळखुटा-वडफळी व मध्यप्रदेशच्या सिमेपर्यंत (१९० किमी) या रस्त्यांचा समावेश आहे.
डॉ.गावित पुढेे म्हणाल्या, आगामी काळात नंदुरबार लोकसभा मतदार संघात नंदुरबार येथे क्रिटीकेअर हॉस्पीटलला मंजूरी, जिल्ह्यातील सर्व तालुक्यात सार्वजनिक आरोग्य शाळा उभारणे, जिल्ह्यात एक सैनिकी शाळा मंजूर करणे,  जिल्ह्यात टेक्सटाईल पार्कसाठी प्रयत्न, मेडिकल इक्वीपमेंट डिवाईस पार्क सुरु करणे, नंदुरबार येथे केंद्रिय विद्यालय सुरु करणे, नंदुरबार येथे पासपोर्ट कार्यालय सुरु करणे, नंदुरबार येथे प्लास्टिक इंजिनीयरींग कॉलेज सुरु करणे आदी कामे प्रस्तावित आहेत, लवकरच त्यांना मंजूरी मिळणार आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील ३६ गावांना ४७९ कोटी ८६ लाख ९४ हजार ३९१ रुपये मंजूर करण्यात आले आहे. साक्री व शिरपूर तालुक्यातील पाच गावांना ४ हजार ८३९ कोटी ४१ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्ह्यात मतदार संघात ११६५ गावांमध्ये ९१८ कोटी ९४ लाख मंजूर करण्यात आले आहे. याशिवाय १७३३ सोलर योजनांसाठी २३९ कोटी ६१ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात ६ लाख ८२ हजार ७१७ जनधन खाते उघडण्यात आले आहेत. पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेअंतर्गत १ लाख ३७ हजार ८६३ खाते उघडण्यात आले आहेत. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत २ लाख ६७ हजार ९१७ खाते उघडण्यात आले आहेत. अटल पेन्शन योजनेअंतर्गत ३५ हजार १९८ खाते उघडण्यात आले आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी १ लाख २२ हजार २५ शेतकर्‍यांना वाटप करण्यात आला आहे. १ लाख ९ हजार ४६२ शेतकर्‍यांना किसान क्रेडिट कार्डचे वाटप करण्यात आले असून यासाठी ३२६ कोटी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. स्टार्ट अप इंडिया मधून ४० लोकांना ६९१ कोटी ९ लाखाच्या निधी कर्ज म्हणून देण्यात आला आहे. मुद्रा लोनमधून ३० हजार ९७५ लोकांना ११७ कोटी ४७ लाखाचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. पंतप्रधान स्वनिधी योजनेमधून २ हजार ७७२ जणांना १९२ कोटी ६४ लाखाचा निधी देण्यात आला आहे.
डॉ.गावित पुढे म्हणाल्या, नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सन २०१४ पासून २०२२ पर्यंत यापुर्वी कधीही झालेेली नव्हती, एवढी कामे पूर्ण झाली आहेत. शहरी भागात २६ तर ग्रामीण भागात ४३ अशा एकूण ६९ मोबाईल टॉवर्सला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच नव्याने एकूण १४० टॉवर्सला मंजुरी मिळाली आहे. रेडीओ एफएम सुरु करण्यात आले आहे. अक्कलकुवा येथील पोस्ट ऑफिस कार्यालयात नव्याने रेल्वे तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नंदुरबार रेल्वेस्थानक इमारतीला हेरिटेज लूक देऊन सदर इमारतीच्या नूतनीकरणासाठी २ कोटी ३० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय महिला प्रतीक्षालय, बैठक हॉलचे बांधकाम, सीएमआय ऑफिस, पार्सल ऑफिस बांधकाम, वाढीव बोगद्याचे बांधकाम, दिव्यांगांसाठी नवीन शौचालयाचे बांधकाम करण्यात आले आहेत आदी २४ कोटी ७२ लाख ३४ हजार ६१३ रुपयांची कामे झाली आहेत.
इंदिरा आवास योजनेअंतर्गत सन २०१४ ते १६ या कालावधीत ४७ हजार ६४७ घरकुले मंजूर झाले असून यासाठी ४५२ कोटी ६४ लाख ६५ हजार, सन २०१६ ते २२ दरम्यान पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १ लाख ६४ हजार ५४७ घरकुल मंजूर झाले असून १९७४ कोटी ५६ लाख ४० हजार रुपयांच्या निधी मंजूर झाला आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सन २०१४ ते २२ दरम्यान १ लाख ८५ हजार ७३ शौचालय मंजूर झाले असून त्यावर २२२ कोटी ८ लाख ७६ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील १३५० दिव्यांगांना कृत्रिम पाय, श्रवण यंत्र, व्हीलचेअर यासह विविध वस्तूंसाठी १८ लाख ८८ हजार २५४ रुपये खर्च करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील १७ ठिकाणी विविध बँकांच्या १७ शाखा मंजूर करण्यात आल्या आहेत. श्रावणी येथील नवोदय विद्यालयासाठी १६ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यात २८ नवीन गॅस एजन्सी उज्वला योजनेकरता मंजुर करण्यात आल्या आहेत. स्थलांतर करणार्‍या ५६ हजार सर्वेक्षित कुटुंबांना एक देश एक रेशन कार्ड अंतर्गत लाभ देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील चार ठिकाणी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूलसाठी १२४ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच शासकीय महाविद्यालयाला १९५ कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, असेही डॉ.गावित म्हणाल्या. यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित, राजेंद्र गावित उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

जळखे येथे अनुदानित आश्रम शाळेत शैक्षणिक कार्यशाळा

Next Post

प्रत्येक गरजू आदिवासी बांधवांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा ; पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

Next Post
प्रत्येक गरजू आदिवासी बांधवांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा ; पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

प्रत्येक गरजू आदिवासी बांधवांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा ; पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्याच्या सार्थक पाटीलला रोबोटिक्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक

शहाद्याच्या सार्थक पाटीलला रोबोटिक्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक

January 22, 2026
शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

January 22, 2026
अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

January 22, 2026
सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

January 22, 2026
नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा गौरव

नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा गौरव

January 22, 2026
हिंदुत्वाचे सैनिक बनून संघटित व्हा आणि हिंदू मतांची वोट बँक स्थापन करा :  कालीचरण महाराज

हिंदुत्वाचे सैनिक बनून संघटित व्हा आणि हिंदू मतांची वोट बँक स्थापन करा : कालीचरण महाराज

January 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add