नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा चर्मकार समाजाच्या वतीने दि.18 जून 2023 रोजी जिल्हास्तरीय विद्यार्थी गुणगौरव सोहळा व शैक्षणिक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या सोहळ्यात दहावी, बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रात यश संपादन करणार्या समाजातील यशस्वीतांचा गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास चर्मकार समाजबांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नंदुरबार जिल्हा चर्मकार समाजातर्फे करण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्हा चर्मकार समाजातर्फे दरवर्षी समाजातील गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रात यश मिळविणार्या व्यक्तींचा गौरव करण्यात येतो. यावर्षीही दहावी व बारावी परीक्षेचा निकाल लागला आहे. या निकालात चर्मकार समाजातील अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. म्हणून नंदुरबार जिल्हा चर्मकार समाजाच्या वतीने दि.18 जून 2023 रोजी जिल्हास्तरीय विद्यार्थी गुणगौरव सोहळा व शैक्षणिक मार्गदर्शन शिबीर- 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. नंदुरबार येथील पंचायत समिती हॉलमध्ये दि.18 जून रोजी सकाळी 10 वाजता जिल्हास्तरीय विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि शैक्षणिक मार्गदर्शन शिबिर होईल. यावेळी दहावी, बारावीसह विविध परिक्षा व कला, क्रीडा क्षेत्रांमध्ये यश संपादन करणार्या विद्यार्थी व व्यक्तींचा गुणगौरव करण्यात येईल. यासाठी नाव नोंदणीसाठी धनराज अहिरे (नंदुरबार, मो.8888440729), सुरेश चव्हाण (शहादा मो.8805666969), विजय तिजवीज (नवापूर मो.9021803567), जीवन अहिरे (तळोदा मो.9370368414), आनंद चव्हाण (धडगाव मो.9420857737), प्रविण अहिरे (खापर मो.9325110188) कुणाल चव्हाण (विसरवाडी मो.9665000772), अविनाश पवार (खांडबारा मो.976550644), चेतन चव्हाण (चिंचपाडा 9657386787) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच गुणगौरव सोहळ्यासह विद्यार्थ्यांसह समाजबांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नंदुरबार जिल्हा चर्मकार समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.








