Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महाराष्ट्रातील 114 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू, मंदिर महासंघाची घोषणा

team by team
June 10, 2023
in राज्य
0
महाराष्ट्रातील 114 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू,  मंदिर महासंघाची घोषणा

नंदूरबार l प्रतिनिधी

 

जळगाव, अकोला, धुळे, नागपूर, नाशिक, अमरावती, अहिल्यानगर (नगर) यांसह कोकण विभागातील मिळून महाराष्ट्रातील एकूण 114 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. यामध्ये कल मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील 18 मंदिरांचा समावेश आहे, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी दिली.

 

 

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने मुंबईमधील श्री शीतलादेवी मंदिरात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी जीवदानी मंदिराचे अध्यक्ष प्रदीप तेंडोलकर, कडाव गणपती मंदिराचे विश्वस्त (कर्जत) विनायक उपाध्ये, केरलीय क्षेत्रपरिपालन समितीचे आचार्य पी.पी. एम्. नायर हे उपस्थित होते. वस्त्रसंहिता लागू करण्यात येणार्‍या मंदिरांच्या नावांची घोषणा या वेळी सुनील घनवट यांनी केली.

 

 

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने 7 जून या दिवशी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये मुंबई, ठाणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांतील मंदिरांच्या ट्रस्टींची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला उपस्थित सर्व मंदिरांच्या ट्रस्टींनी मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याला ठराव एकमताने संमत केला. वर्ष 2020 मध्ये महाराष्ट्र शासनाने मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये वस्त्रसंहिता लागू केली. यामध्ये ‘जीन्स पँट’, ‘टी-शर्ट’, भडक रंगांचे कपडे यांवर बंदी घालण्यात आली आहे.

 

 

ही वस्त्रसंहिता लागू करण्यामागे जनमानसांत शासकीय प्रतिमा बिघडू नये, हा सरकारचा हेतू होता. देशातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, मशिदी आणि अन्य प्रार्थनास्थळे, खाजगी आस्थापने, शाळा-महाविद्यालय, न्यायालय, पोलीस आदी सर्वच क्षेत्रांत वस्त्रसंहिता लागू आहे. त्याप्रमाणे मंदिरांमध्येही वस्त्रसंहिता असावी, असे सुनील घनवट यांनी म्हटले.

 

काहीजण मंदिरांमध्ये अंगप्रदर्शन करणारी उत्तेजक, अशोभनीय, असभ्य, फाटलेल्या जीन्स आणि तोकड्या कपड्यांमध्ये येतात. सात्त्विक वेशभूषा परिधान करून मंदिरात आल्यावर भक्तांना मंदिरातील चैतन्याचा लाभ होतो, तसेच मंदिरातील पावित्र्य, मांगल्य, परंपरा आणि संस्कृती टिकून रहाते, अशी हिंदु धर्मांची शिकवण आहे. यासाठीच मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय मंदिर विश्वस्तांनी स्वयंस्फूर्तीने घेतला आहे. हा केवळ प्रारंभ आहे. भविष्यात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांतील आणखीही काही मंदिरे वस्त्रसंहिता लागू करणार असल्याचे जीएस्बी टेंम्पल ट्रस्टचे मानद चिटणीस आणि कायम विश्वस्त शशांक गुळगुळे यांनी सांगितले.

 

 

आतापर्यंत 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले उज्जैनचे श्री महाकालेश्वर मंदिर, महाराष्ट्रातील श्री घृष्णेश्वर मंदिर, अंमळनेर येथील श्रीदेव मंगळग्रह मंदिर, वाराणसीचे श्री काशी-विश्वेश्वर मंदिर, आंध्रप्रदेशचे श्री तिरुपती बालाजी मंदिर, केरळचे विख्यात श्री पद्मानाभस्वामी मंदिर, कन्याकुमारीचे श्री माता मंदिर अशा काही प्रसिद्ध मंदिरांमध्ये अनेक वर्षांपासून सात्त्विक वस्त्रसंहिता लागू आहे. गोव्यातील बहुतांश मंदिरांसह ‘बेसिलिका ऑफ बॉर्न जीसस’ आणि ‘सी कैथ्रेडल या मोठ्या चर्चमध्येही वस्त्रसंहिता लागू आहे. सनातन संस्थेच्या सौ. धनश्री केळशीकर यांनी मंदिरामध्ये सात्त्विक पोषाख परिधान केल्यामुळे मंदिरातील पावित्र्याचा लाभ होत असल्याचे म्हटले.

 

 

या वेळी जीएस्बी टेंम्पल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऋत्विक औरंगाबादकर, खजिनदार सौ. कल्पना प्रभू, श्री शीतलादेवी आणि मुरलीधर देवस्थान यांचे पालक विश्वस्त अनिल परूळकर, भुलेश्वर आणि बालाजी रामजी देवस्थानचे पालक विश्वस्त दीपक वालावलकर, माहीम येथील दत्त मंदिराचे पुजारी किशोर सारंगुल, श्री वाळकेश्वर मंदिराचे पदाधिकारी पंकज सोलंकी हे उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्हा चर्मकार समाजातर्फे 18 जून रोजी विद्यार्थी गुणगौरव सोहळा

Next Post

रूपाली चाकणकर व जयंत पाटील यांच्या उपस्थितीत नवापूर तालुक्यात 15 जुन रोजी विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

Next Post
रूपाली चाकणकर व जयंत पाटील यांच्या उपस्थितीत नवापूर तालुक्यात 15 जुन रोजी विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

रूपाली चाकणकर व जयंत पाटील यांच्या उपस्थितीत नवापूर तालुक्यात 15 जुन रोजी विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add