नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हा परिषद शाळेतील संगणक , एलसीडी टीव्ही , इन्व्हर्टर , बॅटरी चोरीला गेलेले साहित्य चोरट्यांना पकडून हस्तगत करीत जप्त करण्यात आले आहे.हि अत्यंत चोखपणे उत्तम कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांकडून प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने पोलीस पथकाचे कौतुक करण्यात येत आहे.प्रातिनिधिक स्वरूपात प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचा सत्कार करण्यात आला.
कर्तव्यदक्ष पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील , अपर पोलिस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविन्द्र कळमकर , सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील , हवालदार रवींद्र पाडवी , पोलीस नाईक गोपाल चौधरी , विकास कापुरे , पुरुषोत्तम सोनार , मोहन ढमढेरे , अविनाश चव्हाण , जितेंद्र अहिरराव , विजय घुले सर्व नंदुरबार पोलीस पथकाचे अधिकारी यांचे महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत , जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई , जिल्हा संघटक गणेश पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस निरीक्षक श्री.रविंद्र कळमकर यांना गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला .जिल्हा परिषदेच्या १ नव्हे २ नव्हे तर तब्बल १८ शाळा फोडणाऱ्या सक्रिय टोळीच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने ‘ टायगर’सह त्याच्या साथीदारांना जेरबंद केले आहे . या कारवाईत ३ लाख ७२ हजार रुपये किमतीच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद शाळांमध्ये डल्ला मारणाऱ्या चोरट्यांचा एलसीबी पोलीस पथकाने कारवाई करून कौतुकास्पद यश मिळाल्यामुळे शिक्षक , पालकांकडून नंदुरबार पोलीस दलाचे अभिनंदन करण्यात येत आहे .