-दि.२७ सप्टेंबर २०२१ सोमवार रोजी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे विरोधात तसेच देशात भरमसाठ वाढलेल्या महागाई विरोधात संयुक्त किसान मोर्चा व देशभरातील शेतकरी संघटनांनी बंद पुकारला असून या बंदला नंदुरबार जिल्हा प्रहार शेतकरी संघटनेचा पूर्णपणे पाठींबा असून या भारत बंद यशस्वी करण्यासाठी तमाम शेतकरी, व्यापारी बांधव व इतर नागरीकांनी एकजुटीचे दर्शन घडवून बंद यशस्वी करावा, असे आवाहन हार शेतकरी संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष बिपीन चंद्रकांत पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
दि.२७ सप्टेंबर २०२१ सोमवार रोजी शेतकर्यांवर लादलेल्या तीन कृषि कायदे केंद्र सरकारने रद् करावेत, तसेच शेतकर्यांना उत्पादन खर्चाचा दिडपट हमीभाव मिळावा, खाजगीकरणाची निती बंद करावी, पेट्रोल, डिझेल, गॅस इत्यादींच्या किंमती कमी करुन नागरीकांना दिलासा द्यावा, तसेच केंद्र सरकार आणणार असणारे वीज दुरुस्ती विधेयक मागे घ्यावेत, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत कामाचे दिवस वाढवून शेत मंजुरांचे रोजगार हमीचे वेतन दुप्पट करावे. राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकर्यांना पीककर्ज देण्यासाठी शेतकर्यांच्या सीबी स्कोअर तसेच ज्या शेतकर्यांनी ओटीएस योजनेत बँकेचे कर्ज भरले आहे, त्या शेतकर्यांना त्वरीत कर्ज मंजुर करावे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्यांना आर्थिक मदत तसेच पिकविमाधारक शेतकर्यांना पीकविम्याची रक्कम परत मिळावी. कामगार विरोधी कायदे मागे घ्यावी, यासाठी देशभरातील शेतकरी संघटनांनी बंद पुकारला असून प्रहार शेतकरी संघटना नंदुरबार जिल्ह्याचा बंदला पूर्णपणे पाठींबा असून या भारत बंद यशस्वी करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रहार शेतकरी संघटनेच्यावतीने तमाम शेतकरी, व्यापारी बांधव व इतर नागरीकांना भरमसाठ वाढलेल्या महागाई विरोधात एकजुटीचे दर्शन घडवून बंद यशस्वी करावा, असे आवाहन प्रहार शेतकरी संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष बिपीन चंद्रकांत पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.