नंदुरबार l प्रतिनिधी
एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याने जयेश राजेंद्र सोलंकी (ठाकूर) याची मुंबई येथील मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
जयेश राजेंद्र सोलंकी (ठाकूर) यांनी २०२१ मध्ये एमपीएससीची परीक्षा दिली होती. एमपीएससीची परीक्षा जयेश सोलंकी हा एसटी प्रवर्गातून नवव्या क्रमांकावर उत्तीर्ण झाला होता. त्यानंतर त्याची मुलाखत झाल्याने निकाल लागला असून जयेश राजेंद्र सोलंकी (ठाकुर) यांची मुंबई येथील मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून नियुक्ती झाली.
जयेश सोलंकी याने नंदुरबार येथील श्रॉफ हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे. तसेच जयेश हा ग.स.बँक नंदुरबारचे सेवानिवृत्त शाखा अधिकारी राजेंद्र गुलाबसिंग सोलंकी (ठाकूर) यांचा चिरंजीव असून नंदुरबार जिल्हा व सत्र न्यायालयातील अधिक्षक गोविंद उत्तम भामरे, नंदुरबार जिल्हा ठाकूर जमात मंडळाचे अध्यक्ष संदीप (बापू) उत्तम ठाकूर यांचा भाचा आहे.








