नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील महिलांचे तक्रार/समस्या निवारण करण्याकरीता व महिलांसाठीच्या शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी 25 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता तहसिल कार्यालय, नंदुरबार येथे “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती तालुकास्तरीय समाधान” शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे तहसिलदार तथा अध्यक्ष तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन भाऊसाहेब थोरात यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
या शिबिरात तालुकास्तरावरील सर्व विभाग प्रमुख महिलांच्या आलेल्या तक्रारींचा निपटारा त्याच ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणेयात येणार आहे. जास्तीत जास्त महिलांनी या शिबिरास उपस्थित राहुन शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहनही प्रसिध्दी पत्रकान्वये करण्यात आले आहे.








