शहादा l प्रतिनिधी
शहरातील कुकडेल परिसरातील आझाद नगर चौकातील अल्पवयीन मुलीची छेड काढल्या प्रकरणी वाद निर्माण झाला होता पोलिसांनी वेळीच दखल घेतल्याने मोठा अनर्थ टळला. याबाबत शहादा पोलिसात अल्पवयीन संशयिता विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 मे रोजी पीडित युवती व तिचे सहकारी दुपारी पिक्चर ला जात असताना बागवान गल्ली परिसरात एका अल्पवयिन युवकाने तिला थांबवून सांगितले तू पिक्चर ला जाऊ नको आपण दोघे कुठेतरी बाहेर जाऊ असे त्याचप्रमाणे त्यांचा पाठलाग केला यानंतर सदर युवती घाबरून आपल्या घरी गेली व तेथून आपल्या नातेवाईकांच्या घरी गावाला निघून गेली घटनेची माहिती पीडित युवतीच्या नातेवाईकांना मिळाल्यानंतर शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास त्यांनी याबाबत सदर संशयीतास या प्रकरणी जाब विचारण्यासाठी त्याच्या घरी गेले असता तेथे त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली.
पाहता पाहता मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याने वातावरण तंग झाले होते याबाबत घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत व सहका-यानी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले जमावाला पागवण्यासह दोन्ही गटात शांतता निर्माण केली
शनिवारी सकाळी युवती व तिचे नातेवाईक शहादा पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांनी घडलेल्या प्रकाराबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर पीडित युतीच्या फिर्यादीवरून अल्पवयीन संशयिता विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याला ताब्यात घेऊन कोर्टात नंदुरबार येथे हजर केले आहे. याबाबत पुढील तपास उपनिरीक्षक माया राजपूत करीत आहे.
दरम्यान शुक्रवारी रात्री घटना घडल्यानंतर परिसरात शांतता राहावी व अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवत यानी ठीक ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावला असून शनिवारी सकाळी हा बंदोबस्त कायम होता परिसरात शांतता असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.








