नंदुरबार l प्रतिनिधी
मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर अशा पद्धतीने केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार व नगर पालिका हा कार्यक्रम शहर भरात राबविण्यात येणार आहे. या कार्यालयाचे उद्घाटन नंदुरबार नगर परिषदेचे शहर ब्रॅण्ड ॲम्बेसेटर गजेंद्र शिंपी यांच्या हस्ते करण्यात आले. नंदुरबार शहरातील नागरीकांनीआपल्याकडे जुने कपडे असतील अथवा टाकाऊ वस्तु असतील त्यांनी या वस्तू आमच्या स्वच्छता विभागात जमा करावेत, असे आवाहन गजेंद्र शिंपी यांनी केले.
नंदुरबार जुन्या नगरपालिकेच्या इमारतीत मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. मागे शहरामध्ये माणुसकीची भिंत निर्माण केली होती. परंतू त्याला प्रतिसाद पाहता योग्य नियोजन नाही. धुळ, माती, पाणी यामुळे ते कपडे कोणी घेत नाहीत. म्हणून केंद्र सरकार, महाराष्ट्र व नंदुरबार नगर परिषद हे तिघे मिळून आता कपडे संकलन करतील. या संदर्भात तीन सेंटर उभे करण्यात आले आहेत. एक जुन्या नगरपालिकेत, दुसरे न.पा.शाळा क्र.१ मध्ये व तिसरे सिंधी कॉलनीतील नगरपालिका शाळा. तरी नागरीकांनी आपले टाकाऊ कपडे व वस्तु गोरगरीबांसाठी द्यावेत.
त्या कपड्यांची नोंद आमचा माणूस करेल. तसेच ते कपडे रिसायकलिंग करुन स्वच्छ करुन गरीब लोकांना वितरीत केले जातील. या संदर्भात नगर परिषदेचे कर्मचारी स्वच्छता विभागाचे या कामात सहकार्य करतील. या संदर्भात लोक जागृती, घरोघर जावून लोकांना प्रबोधन करणे असे विविध उपक्रम राबविले जातील. तरी जनतेने गरीब माणसांना कपडे उपलब्ध व्हावेत म्हणून आपल्याकडे जे टाकाऊ कपडे असतील ते आपण या वरील सेंटरमध्ये जमा करावेत.
जेणेकरुन आपण सामान्य कुटूंबांना मदत करु शकतो. हा एक सामाजिक उपक्रम असून नंदुरबार नगर परिषद आवाहन करण्यात आल्याचे गजेंद्र शिंपी यांनी सांगितले.. या कार्यक्रमाला नगर परिषदेचे स्वच्छता अभियंता विशाल कांबळी, आरोग्य निरीक्षक रविंद्र मराठे, सेवा फाऊंडेशनचे व्यवस्थापक भारत भुषण, आरोग्य विभागाचे लिपीक मोहन पिंगळे तसेच मुकादम सागर, राकेश सारसर, वसीम शेख, किशोर चौधरी, विक्रम कोळी, सुपरवायझर अरविंद राजपूत, मुकेश घाटे, सऊत शेख, सागर गुलाले, दीपक मराठे, दिलीप झा आदी उपस्थित होते.








